Child Abuse Case : संतापजनक! शिक्षकाकडून 13 वर्षांपासून लैंगिक शोषण
Disabled Students Abuse Case : दृक् आणि श्राव्य या खासगी शाळेतील शिक्षक गेल्या 13 वर्षांपासून विशेष दिव्यांग मुलांचे लैंगिक शोषण करत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
शिक्षकाने मूकबधिर तथा दिव्यांग मुलांच्या बोलण्याच्या अक्षमतेचा फायदा घेत 13 वर्षांपासून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. नलैंगिक शोषण झालेल्या विद्यार्थ्यांचे सांकेतिक भाषेत व्हिडिओ स्टेटमेंट सादर केले. कर्नाटक राज्याच्या चामराजनगर जिल्ह्यात संतापजनक घटना उघडकीस आला आहे.
कर्नाटक (Karnataka) राज्याच्या चामराजनगर जिल्ह्यात संतापजनक घटना, शैक्षणिक संस्थेतील एका व्यक्तीने ही बाब रत्नाकुमार सत्यवासी यांच्याशी शेअर केली. यानंतर रत्नाकुमार यांनी चामराजनगरचे पोलिस अधीक्षक डॉ. बी. टी. कविता यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि लैंगिक शोषण झालेल्या विद्यार्थ्यांचे सांकेतिक भाषेत व्हिडिओ स्टेटमेंट सादर केले.
तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी (Police) शाळेला भेट देऊन तपास सुरू केला आहे. कविता म्हणाल्या की, तपासाच्या सुरवातीला अधिकाऱ्यांना कोणताही पुरावा सापडला नाही. तथापि, संस्थेने केलेल्या अंतर्गत चौकशीत असे दिसून आले की, शाळेत पूर्वी शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता.
तिच्या जबाबाच्या आधारे 30 ऑक्टोबरला पोक्सो (बाल लैंगिक प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला. परंतु आरोपीला अटक केलेली नाही; पण तपास सुरू आहे, असे कविता यांनी सांगितले.
29 वर्षीय पीडित युवती 16 वर्षांची असताना शिक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. नंतर तिने शिक्षकाशी लग्न केले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते आता इतर मुलांवरील कथित अत्याचाराची चौकशी करत आहेत.
मुलांच्या लैंगिक शोषणाबाबत संस्थेकडे यापूर्वी तक्रार दाखल झाली होती. 12 वर्षांहून अधिक काळ शाळेत अनेक मुला-मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. मुले घाबरली आहेत आणि रत्नाकुमार यांनी आरोप केला आहे की, केवळ शिक्षकच नाही, तर संस्थेतील काही कर्मचारी देखील यामध्ये सहभागी आहेत.
संस्थेतील हा प्रकार समोर आल्याने चामराजनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पालकांनी संस्थेतील मुलांकडे धाव घेतली आहे. वेगवेगळ्या चौकशी करत आहेत. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे गंभीर झाला असून, काही पालकांनी मुलांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात संस्थेची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक संस्थांकडून सुरू झाली आहे.
या प्रकरणाची चौकशीसाठी विशेष तपासी पथकाची स्थापना करण्याची मागणीही होत आहे. मुल दिव्यांग असल्याने त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याची मागणी सरकारकडे केली जात आहे. शोषित मुलांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी सरकारे संवेदनशीलपणा दाखवत पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

