Karnataka Election 2023 LIVE Updates : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज (बुधवारी) मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काल (मंगळवारी) कर्नाटकातील जनतेसाठी पत्र जारी केले आहे. (karnataka election 2023 congress complains pm modi video message action election commission)
पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून व्हिडिओ शेअर केले असून यात पंतप्रधानांनी कर्नाटकातील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. या पत्रावर आक्षेप घेत काँग्रेसने निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांच्या विरोधात कारवाईची मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पत्र दिले आहे. तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा , उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्यावर आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवडणूक आयोगासाठी ही अग्रीपरिक्षा असेल, काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मतदारांना आवाहन करणाऱ्या मोदी यांच्या व्हिडिओवरुन निशाणा साधला आहे.
काय म्हटलं आहे मोदींनी पत्रात..
या पंतप्रधान मोदी पत्रात म्हटले, “तुम्ही माझ्यावर नेहमीच प्रेमाचा वर्षाव केला आहे. तुमचे प्रेम मला दैवी वरदानासारखे वाटते. स्वातंत्र्याच्या अमृत काळात देश विकसित राष्ट्र बनवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. कर्नाटकासाठी आमचे व्हिजन साकार करण्यासाठी चळवळीचे नेतृत्व करण्यास आम्ही उत्सुक आहोत. सध्याच्या घडीला भारताची अर्थव्यवस्था ही पाचवी आहे. पण, जगात आपली अर्थव्यवस्था पुढील तीनमध्ये आणण्याचे आमचे ध्येय आहे. आपल्यासाठी हे शक्य आहे, जेव्हा कर्नाटकाची अर्थव्यवस्था $१ ट्रिलियनची होईल.”
कोण बाजी मारणार..
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) आज (बुधवारी) सकाळी सात वाजता मतदानास सुरवात झाली आहे. प्रचाराच्या काळात भाजपा, काँग्रेस, धर्मनिरपेक्ष जनता दल या तिन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. याच कारणामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्या पाच वर्षांत कर्नाटकात तीन मुख्यमंत्री झाले. सध्या भाजपचे १२१ आमदार आहे, काँग्रेसकडे ७० तर जेडीएसकडे ३० आमदार आहेत.
या विधानसभेसाठी काँग्रेसचे २२१, भाजप सर्व २२४, जेडीएस २०८, आम आदमी पार्टी ने २०८, बसपा १२७, समाजवादी पार्टी १४,राष्ट्रवादीचे ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या निवडणुकीत भाजपचे ३८, काँग्रेस ३६, जेडीएसचे ३१ उमेदवार एससी आहेत. काँग्रेसचे १५, जेडीएसचे २० उमेदवार मुस्लिम आहेत. भाजपचा एकही उमेदवार या वर्गांतील नाही.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.