Karnataka Election Result : कर्नाटकला सर्वाधिक आमदार देणाऱ्या बेळगावात कुणी मारली बाजी?

Karnataka Assembly Elections Result 2023 : भाजप बहुतांश उमेदवार मराठी.. पण मराठी एकीकरण समितीची पाटी कोरीच..
Karnataka Election Result :
Karnataka Election Result :Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Elections Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसने बहुमतापेक्षाही जास्त जागा मिळवत निर्भेळ यश मिळवले आहे. बऱ्याच मोठ्या कालखंडानतंर या दणदणीत विजयामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसमध्ये चैतन्याचं वातावरण पसरले आहे. कर्नाटक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सभा आणि रँली करत जंगजंग पछाडले होते. मात्र इथे भाजपला विजयी करण्यात मोदींचा करिश्मादेखील प्रभाव दाखवू शकला, भाजपला नाकारत कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला संधी दिली. (Who won in Belgaum, which gives the most MLAs to Karnataka)

Karnataka Election Result :
Karnataka Women MLA : कर्नाटकच्या २२४ आमदारांच्या विधानसभेत पोचल्या अवघ्या दहा जणी!

एकीकडे कर्नाटकच्या निकालाची चर्चा असताना, महाराष्ट्रीय लोकांचे लक्ष कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्याकडे आणि विशेषत मराठी सीमाभागात होते. बेळगाव जिल्ह्यातून कर्नाटकचे राज्यातून सर्वाधिक आमदार निवडून येतात. अनेक मराठी उमेदवारही या भागातून निवडून येतात. मात्र इथे महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

बेळगावात एकूण १७ जागांपैकी ११ जागा जिंकल्या तर भाजपला जिल्ह्यात केवळ ६ जागा जिंकल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यात निवडून येणाऱ्या बहुतांश उमेदवार मराठी आहेत.

Karnataka Election Result :
Ashok Chavan In Karnataka campaigning News : सहा मतदारसंघात सभा, तीन ठिकाणी विजय ; अशोक चव्हाणांना `फिप्टी-फिप्टी` यश...

बेळगावातील विजयी उमेदवार :

दक्षिण - अभय पाटील- भाजप

खानापूर - विठ्ठल हलगेकर- भाजप

निपाणी - शशिकला जोल्ले - भाजप

गोकाक - रमेश जारकिहोळी- भाजप

आरभावी - भालचंद्र जारकिहोळी - भाजप

हुक्केरी - निखिल कती - भाजप

अथणी - लक्ष्मण सवदी - काँग्रेस (भाजप बंडखोर)

कागवड - भरमगौड कागे- काँग्रेस

कित्तुर - बाबासाहेब पाटील - काँग्रेस

बैलहोंगल - महानतेश कौझलगे - काँग्रेस

कुडची - महेंद्र तमन्नावर- काँग्रेस

सौदत्ती - विश्वास वैद्य- काँग्रेस

रामदुर्ग - अशोक पट्टण- काँग्रेस

यमकनगर्डी - सतीश जारकीहोळ- काँग्रेस

चिकोडी - गणेश हुक्केरी - काँग्रेस

ग्रामीण - लक्ष्मी हेब्बाळकर - काँग्रेस

उत्तर - राजू शेठ - काँग्रेस

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com