Karnataka Exit Poll : कर्नाटकात काँग्रेस 140 पार; महत्त्वाच्या एक्झिट पोलने वाढवले भाजपचे टेन्शन...

Karnataka Polls 2023 LIVE : कर्नाटकातील मतदान आज संपले त्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे.
Karnataka Polls 2023 LIVE
Karnataka Polls 2023 LIVESarkarnama

Karnataka Assembly Election Exit Poll : कर्नाटकातील मतदान आज संपले त्यानंतर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोल नुसार कर्नाटकात (Karnataka Assembly Election) काँग्रेसला मोठे यश मिळेल असे म्हटले आहे. काँग्रेसचा ऐतिहासीक विजय होणार असल्याचे इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे.

काँग्रेस हा सर्वाधिक मोठा पक्ष ठरणार असल्याचे जवळपास सगळ्याच एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. तर सत्ताधारी भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहणारल असून असल्याची शक्याता व्यक्त केली आहे. तर जेडीएसला २० ते २५ जागा मिळण्याची शक्यता आहे.

Karnataka Polls 2023 LIVE
Karnataka Exit Poll 2023: कर्नाटकात 'जेडीएस' बिघडवणार काँग्रेसचा खेळ; चार 'एक्झिट पोल'चा त्रिशंकूचा अंदाज

इंडिया-टुडेच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला (Congress) १२२ ते १४० जगा मिळू शकतात. तर भाजपला ६२ ते ८० जागा मिळण्याचा अंदाज असल्याचे म्हटले आहे. इतरांना ३ जागा दाखवल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये भाजपला (BJP) मोठा धक्का बसणार असल्याचे सांगितले जात आहे.

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार मुंबई-कर्नाटक विभागातील ५० पैकी २८ जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्ष (भाजप) या प्रदेशात 50 पैकी 21 जागा जिंकेल आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) फक्त 1 जागा जिंकेल, असा अंदाजव र्तवला आहे.

Karnataka Polls 2023 LIVE
Karnataka Election Exit Poll: कर्नाटकात कोण ठरणार किंग; काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे?

मुंबई-कर्नाटक विभागातील मतांच्या टक्केवारीचा विचार करता काँग्रेसला 45 टक्के तर भाजपला 42 टक्के मते मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर जेडीएसला या प्रदेशात 8 टक्के मते मिळू शकतात आणि उर्वरित 5 टक्के इतरांना मिळण्याची अपेक्षा आहे.

224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेसाठी बुधवारी सायंकाळी 6 वाजता मतदान संपले. एकूण 65. 69 टक्के मतदान झाले. रामनगरात सर्वाधिक ६३. ३६ टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान ब्रुहत बेंगळुरू दक्षिण हद्दीत 40. 28 टक्के झाले, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com