Congress Vs BJP : राहुल गांधींच्या विरोधात टि्वट करणं भाजप नेत्याला पडलं महागात; काँग्रेस आक्रमक, पोलिसात..

Maharashtra Politics : तक्रारीत काय चुकीचे आहे, हे भाजपने सिद्ध करावे
amit malviya Vs rahul gandhi
amit malviya Vs rahul gandhiSarkarnama

Congress News : काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात टि्वट करणं भाजप नेत्याला महागात पडलं आहे. भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांच्याविरोधात भाजपचे माजी अध्यक्ष रमेश बाबू यांनी तक्रार दिली आहे.

बैगलुरु येथे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. अमित मालवीय यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारीनंतर कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञानमंत्री प्रियांक खर्गे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

गेल्या वर्षी किसान महापंचायत कार्यक्रमानंतर राहुल गांधी यांनी एक टि्वट करीत फोटो पोस्ट केला होता. त्यावर अमित मालवीय यांनी टि्वट करीत राहुल गांधी यांनी पोस्ट केलेल्या फोटो जुना असल्याचे सांगितले होते. किसान पंचायतीसाठी जमलेल्या शेतकऱ्यांचा जुना फोटो राहुल गांधींनी व्हायरल केला असल्याचे मालवीय यांनी त्यावेळी सांगितले होते.

याबाबत प्रियांक खर्गे म्हणाले, "भाजपला जेव्हा कायदेशीर बाबींचा सामना करावा लागतो, तेव्हा त्यांना अडचणी येतात. त्यांना देशातील कायद्यांचे पालन करण्यासाठी अडचणी येतात. आता राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीत काय चुकीचे आहे, हे भाजपने सिद्ध करावे, त्यांनी या तक्रारीच्या विरोधात न्यायालयात जावे,"

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com