BJP leader murder : भाजप युवा मोर्चा नेत्याचा खून; सहा आरोपींना फाशी, राजकीय वर्तुळात खळबळ

Court delivers strict verdict in Gangavathi murder case; six accused sentenced to death for killing BJP leader Venkatesh Kurubar : कर्नाटक राज्यातील गंगावती शहराचे भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष वेंकटेश कुरूबर उर्फ जेएनएन वेण्की यांच्या खुनात सहा जणांना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली.
BJP leader murder
BJP leader murderSarkarnama
Published on
Updated on

Political murder case : कर्नाटक राज्यातील गंगावती शहराचे भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष वेंकटेश कुरूबर उर्फ जेएनएन वेण्की यांच्या खुनात सहा जणांना अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलीय.

न्यायाधीश सदानंद नागप्पा नाईक यांनी हा निकाल दिला. रवी, मैलारी, धनराज, भीमा, सलीम आणि गंगाधर गौळी अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या खटल्यात न्यायालयाने (Court) सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाची तपासणी केली. तसेच आरोपींचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही पडताळून पाहिला. गंगावती रेल्वे स्थानकाजवळ मारुती नावाच्या युवकावर दगडाने हल्ला करून खून केला होता. त्या प्रकरणात वेंकटेश हे प्रत्यक्ष साक्षीदार होते.तसेच मारुतीच्या उपचारासाठी शेवटपर्यंत मदत केल्यामुळेच वेंकटेश यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले.

सभ्य समाजात अशा प्रकारच्या क्रूर कृत्यांना स्थान नाही. आरोपींच्या गुन्हेगारी (Crime) पार्श्वभूमीचा विचार करून ही कठोर शिक्षा देण्यात येत आहे, असे न्यायाधीशांनी निकाल देताना नमूद केले.

BJP leader murder
Navi Mumbai crime : 24 तासांत रक्तरंजित नवी मुंबई! 3 हत्या, RTI कार्यकर्ता-बिल्डरवर गोळीबार

या आधी न्यायालयाने सहा आरोपींना दोषी ठरवून शिक्षेचा निर्णय राखून ठेवला होता. आरोपींना आवश्यक असल्यास उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. ही माहिती सरकारी वकील एस. नागलक्ष्मी यांनी दिली.

BJP leader murder
Newasa firing case : मुख्याधिकाऱ्यावर गोळीबार! केजरीवालांच्या नेत्यावर गुन्हा; राजकारणात खळबळ, दिल्लीपासून गल्लीपर्यंत चर्चा

भाजप नेत्याच्या हत्येचा घटनाक्रम

गंगावती शहराच्या बाहेरील राणा प्रताप सिंग चौकातील खासगी रुग्णालयाजवळ आठ ऑक्टोबर 2025च्या मध्यरात्री वेंकटेश कुरूबर (वय 32) यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. जुने वैमनस्य आणि मारुती नावाच्या व्यक्तीच्या उपचारासाठी मदत केल्याचा राग यामागील कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

पाठलाग करून खून

त्या रात्री वेंकटेश मित्रांसोबत जेवण करून दुचाकीवरून जात असताना काही युवकांनी मोटारीने त्यांचा पाठलाग केला. त्यांच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडल्यानंतर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांचा खून केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com