Amit Ujagare
अमित उजागरे (@UjagareAmit) हे 'सरकारनामा डिजिटल'मध्ये सिनिअर कंन्टेट रायटर म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींसह राजकीय क्षेत्रांतील घडामोडींवर ते काम करतात. ई-सकाळच्या (esakal.com) व्हिडिओ आणि पॉडकास्टसाठी (@SakalMediaNews) ते संशोधन आणि लेखनाचं काम करत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून त्यांनी 'पत्रकारिता आणि जनसंवाद' या विषयात पदव्युत्तर पदवी धारण केली आहे. पत्रकारितेत त्यांना १४ वर्षांचा अनुभव आहे. करियरच्या या कालावधीत त्यांनी मुद्रित माध्यमं आणि डिजिटल माध्यमातून पत्रकारिता केली आहे. मुद्रित माध्यमात त्यांना पाच वर्षांचा अनुभव आहे तर सध्या डिजिटल मीडियात ते नऊ वर्षांपासून काम करत आहेत.