CPM Secretary Govindan News: केरळमध्ये सोने तस्करीत तीन मंत्र्यांनी नावे समोर आल्याने केरळमध्ये राजकारण ढवळून निघाले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपीने पुन्हा मोठा दावा केला आहे, यात आरोपीने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर सीपीएमच्या नेत्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीला काही महिने बाकी असताना विरोधकांनी सोने गैरव्यवहारावरुन सत्ताधाऱ्यांना अडचणीस पकडले आहेत. या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी स्वप्ना सुरेश हीने सीपीएमचे सचिव गोविंदन मास्टर यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
गोविंदन मास्टर यांनी आपल्याला देश सोडून जाण्यासाठी ३० कोटींची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे. "केरळचे मुख्यमंत्र्यांचे माजी प्रमुख सचिव एम शिवशंकर यांनी गैरव्यवहार बाहेर येत आहेत. मला विजय पिल्लई नावाच्या एका व्यक्तीने फोन करुन देश सोडून जाण्याची धमकी दिली आहे," असा आरोप स्वप्ना हीने केला आहे. सीपीएमचे सचिव गोविंदन मास्टर यांनीच ही धमकी दिल्याचे तिने सांगितले आहे.
मुख्यमंत्री पिनराई विजयन, त्यांची मुलगी बेटी, उद्योजक सुफ अली यांच्याविरोधात बोलल्यास जीवे मारण्यास येईल, अशी धमकी मला देण्यात आली असल्याचे स्वप्ना हीने सांगितले. "मुख्यमंत्री यांच्याशी माझे व्यक्तीगत भांडण नाही. मला धमकी देणाऱ्यांचा फोन नंबर मी माझ्या वकीलाकडे दिला आहे, असे ती म्हणाली. "मी जीवंत राहिली तर मुख्यमंत्र्यांचे अनेक कारनामे उघडकीस आणणार आहे, असा इशारा स्वप्ना सुरेश हीने दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.