Telangana Election : तेलंगणामधील सत्तेच्या चाव्या महिलांच्या हाती; 119 पैकी 65 जागांवर मतदारांची संख्या सर्वाधिक

Keys to power in Telangana held by women: तेलंगणा राज्यातील 119 विधानसभा मतदार संघापैकी 65 जागांवर पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.
Telangana Election : तेलंगणामधील सत्तेच्या चाव्या महिलांच्या हाती; 119 पैकी 65 जागांवर मतदारांची संख्या सर्वाधिक
Published on
Updated on

Telangana Vidhnsabha Election : तेलंगणा राज्यात ३० नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने शेवटच्या टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. याठिकाणी बीआरएस, भाजप व काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होत आहे. दुसरीकडे तेलंगणामधील सत्तेच्या चाव्या महिलेच्या हाती असणार आहेत. तेलंगणा राज्यातील 119 विधानसभा मतदार संघापैकी 65 जागांवर पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे येथील आमदार ठरविण्यात महिला मतदारांचा सिंहाचा वाटा असणार आहे.

Telangana Election : तेलंगणामधील सत्तेच्या चाव्या महिलांच्या हाती; 119 पैकी 65 जागांवर मतदारांची संख्या सर्वाधिक
Rajan Salvi News : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींना मोठा धक्का ; कट्टर समर्थक असलेल्या 'या' बड्या नेत्यानं सोडली साथ

तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांसाठी गुरुवारी 30 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. त्याचा प्रचार येत्या मंगळवारी 28 नोव्हेंबरला संपणार आहे. शेवटच्या दोन दिवसांमध्ये सर्वच राजकीय पक्षाने विजय मिळवण्याच्या निर्धाराने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सर्वच पक्षाकडून शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने अधिकाधिक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Telangana Election : तेलंगणामधील सत्तेच्या चाव्या महिलांच्या हाती; 119 पैकी 65 जागांवर मतदारांची संख्या सर्वाधिक
Shivsena Loksabha News : शिंदे गटाचे ते दोन खासदार कोण ? ज्यांचे तिकीट कापले जाणार..

तेलंगणा राज्यातील 119 जागांपैकी सुमारे 65 जागांवर पुरुष मतदारापेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वच पक्षाकडून महिला मतदानावर लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यामुळेच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना सर्वच पक्षाकडून घोषणा केली जात आहे. भाजपने (bjp) मध्य प्रदेशामधील लाडकी लेक योजनेप्रमाणे तेलंगणा राज्यातील गरीब कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यास तिच्या नावे मुदत ठेव योजना जाहीर केली आहे.

हैदराबाद वगळता निमशहरी, ग्रामीण भागात वर्चस्व

तेलंगणाच्या निवडणुकीत यंदा हैदराबाद वगळता निमशहरी आणि ग्रामीण भागातील अनेक मतदारसंघात महिला मतदारसंघाची संख्या पुरुष मतदारापेक्षा अधिक आहे. काही मतदारसंघात पुरुष महिला मतदारांमध्ये पाचशे ते हजार मतदारांचा फरक आहे, पण काही मतदारसंघात पाच ते सात हजार महिलांचे मतदान अधिक आहे. यामुळे सत्ताधारी बीआरएस (Brs)सह सर्वच पक्षांनी महिलांसाठी अनेक योजना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात महिलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या या घोषणा या कुणाच्या पथ्यावर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Telangana Election : तेलंगणामधील सत्तेच्या चाव्या महिलांच्या हाती; 119 पैकी 65 जागांवर मतदारांची संख्या सर्वाधिक
Telangana Election : तेलंगणात दिग्गज नेत्यांचे 'सेम टू सेम' नाव असलेले उमेदवार !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com