Kiren Rijiju News : मोठी बातमी! किरेन रिजिजू यांना केंद्रीय कायदेमंत्री पदावरुन हटवलं...

National Politics| गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेक सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली होती.
Kiren Rijiju News
Kiren Rijiju NewsSarkarnama

Kiren Rijiju removed from the post : देशाच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. केंद्रीय कायदेमंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना पदावरुन हटवण्यात आल्याची बातमी आहे. गेल्या काही महिन्यात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना पदावरुन हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रिजिजू यांच्या जागी आता अर्जुनराम मेघवाल ही जबाबदारी सांभाळणार आहेत. (Kiren Rijiju was removed from the post of Union Law Minister)

कायदेमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर रिजिजू यांच्याकडे भूविज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अर्जुन राम मेघवाल यांना त्यांच्या सध्याच्या पोर्टफोलिओ व्यतिरिक्त कायदा आणि न्याय मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 18 मे रोजी कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल यांची नियुक्ती केली आहे. किरेन रिजिजू यांना भू-विज्ञान मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. (Kiren Rijiju Latest News)

Kiren Rijiju News
Cheating MLAs : निरजसिह राठोडला आज आणणार नागपूरात, तीन आमदारांकडून घेतले पैसे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांच्याशी केलेल्या सविस्तर चर्चेनंतर हे बदल करण्यात आले आहेत. या फेरबदलामागचे पहिले कारण 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी गेल्या काही दिवसांत न्याय, न्यायालय आणि न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळेही त्यांना पदावरुन हटवल्याचे सांगितले जात आहे. आता हे खाते राजस्थानशी संबंधित असलेल्या अर्जुन मेघवाल यांच्याकडे देण्यात आले आहे.

किरेन रिजिजू हे सध्याच्या आणि निवृत्त न्यायमूर्तींवर केलेल्या टिप्पणीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. देशातील प्रत्येकजण संविधानानुसार काम करतो. देशात कोणीही कोणालाही इशारा देऊ शकत नाही, असेही त्यांनी कॉलेजियमबद्दल म्हटले होते.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com