Modi Oath Ceremony : लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले, तरीही मोदींच्या मंत्रिमंडळात 'त्या' दोघांनी मिळवलं स्थान!

Modi Swearing in Ceremony : जाणून घ्या, नेमके कोण आहेत ते आणि काय आहे त्यांचं वैशिष्ट्य?
Modi Swearing in Ceremony
Modi Swearing in CeremonySarkarnama

Prime Minister Narendra Modi Oath Ceremony : नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि आपल्या तिसऱ्या कार्यकाळाला सुरुवात केली. मोदींच्या शपथविधी वेळी एनडीए घटक पक्षांमधील एकूण 71 जणांना देखील मंत्रिपदाची शपथ दिली गेली. राष्ट्रपती भवनात हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला.

मोदींच्या या मंत्रिमंडळाची काही वैशिष्ट्ये आहेत, जसं की मोदींनी यातही सोशल इंजिअनिरिंग साधण्याचा प्रयत्न केला. शिवाय मंत्रिमंडळात दोनजण असेही आहेत, जे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. मात्र त्यांना मोदींनी मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. ते म्हणजे तामिळनाडूमधील दलित चेहरा एल मुरुगन आणि पंजाब दिवंगत मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू रवनीत सिंह बिट्टू.

Modi Swearing in Ceremony
Modi Oath Ceremony : पंतप्रधान मोदींचं 'Social Engineering' ; मंत्रिमंडळात असा साधला समन्वय!

एल मुरुगन -

तामिळनाडूचे माजी भाजप अध्यक्ष आणि माजी केंद्रीय पशुपालन राज्यमंत्री एल मुरुगन यांना लोकसभा निवडणुकीत डीएमकेच्या एन कायलिझी सेल्वाराज यांनी पराभूत केलं होतं. तरीही त्यांना मोदींनी मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे.

मागील सरकारमध्ये मुरुगन केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री होते. ते आता मध्य प्रदेशातून राज्यसभेचे खासदार आहेत आणि दलित समाजाचे आहेत.

Modi Swearing in Ceremony
Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी ; वाचा फक्त एकाच क्लिकवर!

रवनीत सिंह बिट्टू -

48 वर्षीय रवनीत सिंह बिट्टू तीनवेळा खासदार होते आणि त्यांनी या लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी लुधियाना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु ते काँग्रेसचे उमेदवार अमरिंदर सिंह राजा वारिंग यांच्याकडून पराभूत झाले. रवनीत सिंह बिट्टू हे दिवंगत मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com