काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्याची पुन्हा जोरदार मागणी अन् राहुल गांधी म्हणाले...

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नसल्याचे चित्र आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi
Published on
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाचा (president) तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळत नसल्याचे चित्र आहे. पक्षाच्या कार्यकारी समितीची (CWC) बैठकीत आज नवीन अध्यक्ष निवडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे, अशी जोरदार मागणी बैठकीत करण्यात आली. यावर त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

कोरोना संकट सुरू झाल्यानंतरची काँग्रेस कार्यकारी समितीची पहिली बैठक आज झाली. अध्यक्षपदासह संघटनात्मक फेरबदलाची मागणी जी-23 या नेत्यांच्या गटाने केली होती. या मागणीवर चर्चा करुन पक्षातील फेरबदल पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पुढील वर्षी पंजाब आणि उत्तर प्रदेशसह अन्य काही राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. त्याआधी पक्षाला नवीन अध्यक्ष मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बैठकीत ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावे, अशी जोरदार मागणी केली. या मागणीवर मी विचार करेन, अशी सकारात्मक भूमिका राहुल गांधींनी घेतली. पक्षातील नेत्यांकडून विचारधारेच्या पातळीवर स्पष्टता आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुका होईपर्यंत राहुल गांधींनी हंगामी अध्यक्ष तरी व्हावे, असा आग्रह काही नेत्यांनी बैठकीत धरला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या बैठकीला कार्यकारी समितीचे 57 सदस्य उपस्थित होते. यात पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, माजी केंद्रीय मंत्री पी.चिदंबरम, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि जी-23 मधील काही नेते उपस्थित होते. पक्षाने जी-23 नेत्यांच्या गटाच्या काही मागण्या आजच्या बैठकीत मान्य केल्या आहेत.

Rahul Gandhi
भाजप खासदाराची मुलींसोबत कबड्डी अन् नवीन वादाला निमंत्रण

काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा सुमारे दोन वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीबाबत जानेवारी महिन्यात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती. या बैठकीत अध्यक्षपदाची निवडणूक जून महिन्यात घेण्याचा निर्णय झाला होता. यानंतर जून महिन्यात काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक झाली. यात 23 जूनला होणारी अध्यक्षपदाची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना संकटामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याचे कार्यकारी समितीने म्हटले होते.

Rahul Gandhi
शिवराजसिंह सरकारविरोधात भाजप खासदाराची आघाडी अन् काँग्रेसचाही पाठिंबा

मागील लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला होता. शेवटी सोनिया गांधी यांनाच पुन्हा हंगामी अध्यक्ष म्हणून काम सुरू करावे लागले. पक्षाला अद्याप पुर्णवेळ अध्यक्ष न मिळाल्याने काही नेत्यांकडूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. सतत बैठका होऊनही कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मरगळ दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com