Bihar Politic's : महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही राजकीय भूकंप होणार?; नीतीशकुमारांचे आमदार एनडीएच्या गळा लागल्याचा दावा

महाराष्ट्रानंतर देशाचे लक्ष बिहारकडे लागले आहे.
NitishKumar
NitishKumarSarkarnama
Published on
Updated on

Patana News : महाराष्ट्राप्रमाणचे बिहारमध्ये सत्ताधारी संयुक्त जनता दलात फूट पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लोकजनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी नीतीशकुमार यांचे काही खासदार आणि आमदार एनडीएच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनीही आपल्या पक्षात फूट पडू नये, यासाठी खासदार आणि आमदारांशी वन टू वन संवाद सुरू केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रानंतर देशाचे लक्ष बिहारकडे लागले आहे. (Like Maharashtra, there will be a political earthquake in Bihar too)

महाराष्ट्रात (Maharashtra) अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांची साथ सोडून भाजप-शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत, त्याचपद्धतीने बिहारमध्येही (Bihar) तशाच घडामोडी बिहारमध्ये घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

NitishKumar
Baramati Dudh Sangh: मोठ्या राजकीय उलथापालथीमध्येही अजित पवारांचे बारामतीवर लक्ष; दूध संघाच्या अध्यक्षपदी गावडेंची केली निवड

नितीश कुमार हे राष्ट्रीय जनता दलासोबत गेल्यापासून जेडीयूमध्ये बंडखोरीचा आवाज येऊ लागला आहे. त्यातूनच उपेंद्र कुशवाह यांनी स्वत:चा मार्ग निवडला होता. कुशवाह यांच्यानंतर सुमारे डझनभर नेत्यांनी जेडीयू पक्ष सोडला आहे. आणखी काही नेतेही पक्ष सोडू शकतात, अशी भीती बिहारमध्ये व्यक्त केली जात आहे. नितीशकुमसार यांनाही त्याची जाणीव आहे, असे पासवान म्हणाले.

NitishKumar
Praful Patel News : शरद पवारांना फोन करणार...पण आता आम्ही मागे फिरणार नाही; प्रफुल्ल पटेलांनी केली भूमिका स्पष्ट

संयुक्त जनता दलाचे अनेक आमदार आणि खासदार हे एनडीएमधील कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. जेडीयूचे अनेक आमदार आणि खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचे उपेंद्र कुशवाह आणि आरसीपी सिंह यांनी उघडपणे सांगितले होते. विरोधी पक्षांच्या पुढील बैठकीपूर्वी किंवा लगेचच महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये भाजपकडून ऑपरेशन कमळला सुरुवात केली जाऊ शकते.

NitishKumar
Sharad Pawar Satara Tour : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केले शरद पवारांचे स्वागत...

उपेंद्र कुशवाह-जीतन राम मांझी यांनी नीतीशची बाजू सोडली

माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे पुत्र संतोष सुमन यांनी अचानक बिहार सरकारच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संतोष सुमन हे अपनी पार्टी हमचे अध्यक्ष आहेत. यानंतर जीतनराम मांझी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन एनडीएमध्ये सामील होण्याची घोषणा केली. लोक जनशक्ती पक्षाचे पशुपती पारस गट आणि जीतन राम मांझी यांचा 'हम' पक्ष एनडीएसोबत आहे. याशिवाय एनडीएला आरएलजेडीचे उपेंद्र कुशवाह, चिराग पासवान यांच्या एलजेपी (आर) आणि विकासशील इंसान पार्टीचाही पाठिंबा मिळू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com