Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीमध्ये 2014 आणि 2019 प्रमाणे यंदा पंतप्रधान मोदींची लाट दिसत नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात भाजपच्या जागा घटण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटणाऱ्या जागा भाजप ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश बंगालमध्ये भरून काढेल असे भाजप नेते ठासून सांगत आहे. पश्चिम बंगालमध्ये 42 जागा आहेत. चौथ्या टप्प्यात बंगालमध्ये 77.66 टक्के, पाचव्या टप्प्यात 73 टक्के तर, सहाव्या टप्प्यात तब्बल 78.19 टक्के मतदान झाले आहे. देशातील मतदानाच्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. त्यामुळे वाढलेली मतदांची टक्केवारी ममतांची की मोदींचा खेळ करणार याची राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा आहे. Narendra Modi Vs Mamta Banerjee
2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने BJP बंगालमधील 42 जागांमधील 18 जागा जिंकल्या होत्या. तर, तब्बल 40 टक्के मतं मिळवली होती. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 22 जागा जिंकल्या होत्या. यंदा मात्र भाजप-तृणमूल काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर असल्याच्या चर्चा आहे. भाजप येथे 25 चा आकडा गाठेल, असा भाजप नेत्यांचा होरा आहे. तर, भाजपला 10 जागांवरच विजय मिळेल, असा अंदाज तृणमूलचे Trinamool Congress नेते व्यक्त करत आहेत. मात्र, राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव मात्र भाजपला येवढ्या कमी जागा मिळतील असे मानण्यास तयार नाहीत. भाजपला कमीत कमी 15 जागा मिळतील तर जास्तीत जास्त 20 ते 21 जागांवर विजय मिळेल, योगेंद्र यादव यांचे म्हणणे आहे.
अल्पसंख्यांक मतांचे ध्रुवीकरण...
पश्चिम बंगालमध्ये अल्पसंख्याकांची संख्या 30 टक्के आहे. तृणमूल काँग्रेसचा हा हक्काचा मतदार आहे. त्यामुळे भाजपकडून ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला जातो आहे. मुस्लीम तुमचे हक्काचे आरक्षण हिरावून घेईल, असा प्रचार भाजप करतो आहे. राष्ट्रीय मुद्यांना बंगालमध्ये तितकेसे महत्वाचे नाहीत. त्यामुळे स्थानिक मुद्द्यांवरच ही निवडणूक लढवली जात आहे.
मोदी 20 वेळा बंगालमध्ये
महाराष्ट्रानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Narendra Modi सर्वाधिक सभा घेण्याचा विक्रम पश्चिम बंगालमध्ये केलेला आहे. निवडणूक घोषित होण्यापूर्वी चार वेळा पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये गेले होते. त्यानंतर निवडणुकीचा सातवा शेवटचा टप्प्या संपेपर्यंत मोदींच्या 16 सभा पश्चिम बंगालमध्ये झालेल्या असतील. 2019 मध्ये मोदी 25 वेळा पश्चिम बंगालमध्ये आले होते. तर या लोकसभा निनडणुकीच्या वेळी 20 वेळा ते पश्चिम बंगालमध्ये आलेले असतील.
संदेशाखालीचा 'संदेश' काय?
पश्चिम बंगालमध्ये महिलांचा पाठिंबा हा ममता बॅनर्जींना Mamta Banerjee राहिलेला आहे. पुरुषांच्या तुलनेत तब्बल चार टक्के जास्त मतं ममतांना महिलांची मिळतात. निवडणुकीमध्ये संदेशखालीमध्ये तृणमूलच्या नेत्याने महिलांवरती अत्याचार केल्याच्या घटना उघडकीस आली होती. त्यानंतर भाजपने याच मुद्यावर राज्यभर वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे ममता बॅनर्जींना महिलांचा पाठिंबा कायम राहील का? याची चर्चा आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'लक्ष्मी भांडार' टर्निंग पॉईंट ?
तृणमूल काँग्रेसच्या लक्ष्मी भांडार योजना महिलांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या योजनेतून महिलांना दरमहा हजार रुपये मिळतात तर दलित, आदिवासी महिलांना 1200 रुपये मिळतात. महिला मतदारांच्या एकूण संख्येत 56% महिलांना या योजनेचा थेट फायदा मिळत असल्याने ही योजना तृणमूल काँग्रेसाठी टर्निंग पॉईंट ठरेल, असे म्हटले जात आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.