Lok Sabha Election 2024: मतदानाच्या पहिल्याच दिवशी PM मोदींचं नागरिकांना आवाहन, खास मराठीत ट्विट करत म्हणाले...

Lok Sabha Election 2024 Phase 1 : मागील काही महिन्यांपासून ज्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली होती आणि पुढील पाच वर्षांसाठी देशाची सत्ता कोणाच्या हाती जाणार, हे ठरवणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला आजपासून शुक्रवारी (19 एप्रिल) सुरुवात होत आहे.
Parliament, Narendra Modi
Parliament, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : मागील काही महिन्यांपासून ज्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली होती आणि पुढील पाच वर्षांसाठी देशाची सत्ता कोणाच्या हाती जाणार, हे ठरवणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला (Lok Sabha Election Voting) आजपासून शुक्रवारी (19 एप्रिल) सुरुवात होत आहे.

लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी आज 19 राज्ये व 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. आजच्या मतदानासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Central Election Commission) चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान हा सर्वसामान्य लोकांचा हक्क असून, प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे यासाठी आयोगाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीदेखील लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांना सहा भाषांमधून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. या सहा भाषांमध्ये मराठीचाही समावेश करण्यात आला आहे. मोदींनी एक्सवर पोस्ट करत तरुणांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.

Parliament, Narendra Modi
Social Media : सावधान ! लोकसभा निवडणुकीत संवेदनशील मतदान केंद्र, सोशल मीडियावर पोलिसांचा 'वाॅच'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये लिहिलं, "2024 च्या लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीला आजपासून सुरुवात! 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान होत असल्याने, या जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येनं मतदान करावं असं मी आवाहन करतो. विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं मी आवाहन करतो. शेवटी, प्रत्येक मत मोजले जाते आणि प्रत्येक आवाज महत्त्वाचा असतो!" असं ट्विट मोदींनी केलं आहे. मोदींनी ट्विट करताना तरुण वर्गासह पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केल्याचं दिसत आहे. तसेच प्रत्येक मत किती महत्त्वाचं आहे. याचं महत्त्व समजावून सांगण्याचाही पंतप्रधानांनी प्रयत्न केला आहे.

देशासह महाराष्ट्रामध्येही पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. राज्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या 5 मतदारसंघांचा समावेश होतो. पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तर या वेळी येथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनंगटीवार हे निवडणूक लढवत आहेत.

(Edited By Jagdish Patil)

  • R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com