PM Modi Nomination LIVE: 12 मुख्यमंत्री, 18 कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत मोदी आज उमेदवारी अर्ज भरणार

PM Modi Nomination Varanasi Lok Sabha Seat Today : सकाळी १० वाजता ते भैरव मंदिराला भेट देणार आहेत. त्यापूर्वी एनडीएच्या नेत्यांसोबत बैठकीत ते संवाद साधणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहेत.
PM Modi nomination LIVE
PM Modi nomination LIVESarkarnama

Varanasi News: वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाराणसीमधून ते तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी याच मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती.

मोदींच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या (Varanasi Lok Sabha 2024) कार्यक्रमाला सोहळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 12 भाजपशासित आणि आघाडी राज्यांच्या मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. 18 हून अधिक कॅबिनेट मंत्री उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अन्य केंद्रीय मंत्री आणि भाजपचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

मोदी हे प्रथम वाराणसीतील दशाश्वमेध घाटाला भेट देणार आहेत. सकाळी १० वाजता ते भैरव मंदिराला भेट देणार आहेत. त्यापूर्वी एनडीएच्या नेत्यांसोबत बैठकीत ते संवाद साधणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहेत. सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर ते झारखंडला जाणार आहेत.

PM Modi nomination LIVE
Pune Lok Sabha Election 2024 Voting LIVE: पहिल्यांदाच मतदानासाठी आली अन् तिची तळपायाची आग मस्तकात गेली!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी वाराणसीमध्ये मदन मोहन मालवीय यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर रोड शो केला. या रोड शो दरम्यान लोकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. सव्वा दोन तास चाललेल्या सहा किलोमीटर च्या रोड शोनंतर पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ धाम मंदिरात पोहोचले.

एकनाथ शिंदे, पुष्करसिंह धामींसह 12 मुख्यमंत्री उपस्थित राहणार...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा, हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com