Lok Sabha Election 2024 : कधी होणार लोकसभा निवडणुकांची घोषणा? मोठी अपडेट समोर!

Lok Sabha Election 2024 : येत्या आठवड्यात या तारखेला होणार निवडणुकांची घोषणा?
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा पुढील आठवड्यात जाहीर होण्याची मोठी शक्यता आहे. प्राप्त माहितीनुसार निवडणूक आयोग सोमवार ते बुधवार (दि. 11 व 12 मार्च) जम्मू-काश्मीरचा दौरा करण्याच्या तयारीत आहे. या दौऱ्यात केंद्रशासित प्रदेशात निवडणुका कधी होऊ शकतात, याची चाचपणी केली जाईल. (Latest Marathi News)

एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, 'निवडणूक आयोग जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करू शकते. गुरुवारी किंवा शुक्रवारी (दि. 14 आणि 15 मार्च) सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. खरे तर गेल्या डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला जम्मू-काश्मीरमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत विधानसभा निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र आता केंद्रशासित प्रदेशात लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभा निवडणुकाही होऊ शकते, असे मानले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Manchar NCP News : मंचरच्या मेळाव्यात अतुल बेनकेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, दादांना शपथविधीसाठी...

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी देशभरात सुरक्षा जवानांच्या तैनाती आणि हालचालींबाबत चर्चा सुरू आहे. आयोगाने शुक्रवारी गृह मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाच्या उच्च अधिकाऱ्यांशी या विषयावर बैठका घेतल्या. आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांसह जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका घेण्याच्या शक्यतेवर निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते. आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या विधानसभांचा कार्यकाळ जूनमध्ये वेगवेगळ्या तारखांना संपत आहे. अशा स्थितीत येथे लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुका होऊ शकतात.

Lok Sabha Election 2024
Raj Thackeray On Bjp : "माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, सध्या महाराष्ट्रात...", राज ठाकरेंचा भाजपला टोला

आदर्श आचारसंहितेपूर्वी मोठी राजकीय आश्वासने -

निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू होणार आहे. राजकीय पक्ष मोठमोठी आश्वासने देत असून वेगवेगळ्या प्रकल्पांची उद्घाटने होत आहेत. लोकसभा निवडणुका एप्रिल-मेमध्ये होऊ शकतात, हे लक्षात घेऊन राजकीय पक्षांच्या हालचाली तीव्र झाले आहेत. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससह अन्य पक्षांनीही आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका घेण्याची मागणी होत आहे. डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी शनिवारी सांगितले की केंद्रशासित प्रदेशातील लोक आता अधिक प्रतीक्षा करू शकत नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर लगेचच निवडणुका होतील, अशी आशा आहे. जम्मू-काश्मीरला संपूर्ण आणि स्वतंत्र राज्याचा दर्जा बहाल करण्यात यावा, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com