Kerala Political News : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election News in Marathi) अनेक मतदारसंघांमध्ये कुटुंबातील सदस्यच एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. केरळातही अशीच स्थिती असून, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी यांचे पुत्र अनिल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. अँटनी यांनी मुलाच्या विरोधात रणशिंग फुंकले असून, त्यांच्या पराभवासाठी मैदानात उतरले आहेत.
मुलाच्या उमेदवारीवर बोलताना ए. के. अँटनी (A K Antony) म्हणाले, मुलाचा पराभव व्हायला हवा. काँग्रेसचे उमेदवार अँटो अँटनी यांचा विजय होईल. भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची मुलाची कृती अत्यंत चुकीची होती. काँग्रेस हा माझा धर्म आहे, असे सांगत त्यांनी मुलाच्या राजकारणाबाबत बोलण्यास नकार दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप (BJP)आणि आरएसएसविरोधात लढा देत आहेत. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी काँग्रेसवर केलेले आरोप येथील जनता गांभीर्याने घेईल, असे मला वाटत नाही, असेही अँटनी यांनी स्पष्ट केले. विजयन यांनी मुस्लिम आणि हिंदूंच्या मतांसाठी काँग्रेसकडून सीएएबाबत भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप केला होता.
इंडिया आघाडी दरदिवशी पुढे जात असून, भाजप मागे पडत चालले आहे. सरकार स्थापन करण्याची ही चांगली संधी असल्याचेही अँटनी म्हणाले. दरम्यान, अँटनी यांनी यापूर्वी मुलाच्या भाजप प्रवेशावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते नेहमीच भाजपविरोधात उभे ठाकले आहे. गांधी कुटुंबाचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.