Lok Sabha Election News : निवडणुकीत नुसताच थाट; उमेदवार 8,054… डिपॉझिट जप्त 6,923...

Election Commission : निवडणूक आयोगाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या माहितीनुसार 2019 च्या निवडणुकीत तब्बल सात राष्ट्रीय पक्षांसह 675 राजकीय पक्षांनी उमेदवार उतरवले होते.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election News) रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून विविध मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले जात आहे. पण त्याचबरोबर इतर छोटे-छोटे पक्ष आणि अपक्षही रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. दरवर्षी लोकसभेच्या 543 जागांसाठी हजारो उमेदावर मैदानात असतात. त्यांच्यापैकी अनेकांचे डिपॉझिट जप्त होते. महाराष्ट्रातही अशीच स्थिती आहे. पण निवडणुकीचा नाद आणि थाट कमी होताना दिसत नाही.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यासोबत खुल्या गटासाठी 25 हजार रुपये आणि एससी, एसटी उमेदवारांसाठी 12 हजार 500 डिपॉझिट भरावे लागते. विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या 16.66 टक्क्यांपेक्षा कमी मते मिळालेल्या पराभूत उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होते. दरवर्षी हा आकडा मोठा असतो.

Election Commission
Lok Sabha Election 2024 : मोदींना भिडणार काँग्रेसचा ‘बाहुबली’; निकाल काही लागो, इतिहास घडणार...

देशात 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Election Updates) तब्बल 6 हजार 923 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. या निवडणुकीत एकूण 8 हजार 54 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत 7 हजार 322 पुरूष आणि 726 महिलांनी अर्ज भरला होता. त्यापैकी अनुक्रमे 465 आणि 78 उमेदवारांना विजय मिळाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातही आकडा मोठा

महाराष्ट्रातील (Maharashtra) लोकसभेच्या 48 जागांसाठी 867 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी तब्बल 768 जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यामध्ये 701 पुरूष उमेदवार होते. प्रत्यक्ष 1332 उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 192 जणांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले. तर 273 उमेदवारांनी माघार घेतली होती.

देशभरात 675 पक्ष मैदानात

मागील निवडणुकीत देशभरातील 675 राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली. त्यापैकी सात राष्ट्रीय पक्ष आहेत. निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) प्रत्यक्षात हजारो पक्षांची नोंदणी आहे. पण अनेक पक्ष निवडणुकांपासून दूर राहतात. तर काही पक्ष केवळ काही ठराविक निवडणुकांमध्येच उमेदवार उतरवतात. या पक्षांमुळे आयोगावरील ताणही वाढत चालला आहे.

Election Commission
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीनंतर ममतांचे सरकार कोसळणार? भाजप नेत्याचा मोठा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com