Sadabhau Khot Demanded Two Seats : सदाभाऊ खोत भाजपचं टेन्शन वाढणार ; 'या' दोन जागांवर केला दावा

RAYAT kranti sangathan : रयत क्रांती संघटनेनं वेगली चूल मांडणार ?
Sadabhau Khot
Sadabhau KhotSarkarnama

RAYAT kranti sangathan Sadabhau Khot Demanded two seats : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जागावाटपाबाबत चाचपणी करीत आहेत. भाजपची नुकतीच याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिका आणि आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. (lok sabha elections sadabhau khot of the RAYAT kranti sangathan has demanded two seats from bjp)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जागावाटपावरून मित्र पक्षांत नाराजीचा सुर दिसून येत आहे. भाजपसमोर मित्र पक्षांचा कोणत्या जागा द्यायचा हा मोठा प्रश्न आहे. काही दिवसापूवी रापने भाजपला इशारा देत स्वतंत्र लढण्याचा निर्धार केला आहे. त्यानंतर आता भाजपचा दुसरा मित्र पक्ष रयत क्रांती संघटनेनं वेगली चूल मांडण्याचा विचार बोलून दाखवला आहे.

Sadabhau Khot
Ajit Pawar News : पवारांनी ठाकरेंना स्पष्टचं सांगितलं, "आंबेडकरांसोबत जमवून घ्या, आम्ही तुमच्या सोबत.."

रयत क्रांती संघटनेच्या सदाभाऊ खोत यांनी देखील थेट दोन जागांची मागणी केली आहे. हातकणंगले मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाने अध्यक्ष महादेव जानकर यांनी येत्या लोकसभा निवडणुकीबाबत जागा वाटपावरुन आपले मत व्यक्त केले, जानकरांनी भाजला इशारा देत लोकसभेसाठी चार जागांची मागणी केली.

Sadabhau Khot
Odisha Train Tragedy : ओडिशा रेल्वे अपघाताबाबत नवी अपडेट : जबाबदार कोण ? ; सुप्रीम कोर्टात..

आपल्याला गेल्या लोकसभेच्या वेळी धोका दिला, एकही जागा दिली नाही. या निवडणुकीत चार जागा द्या, अन्यथा स्वतंत्र लढणार असे जानकर यांनी सांगितले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आगामी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहेत. त्यांनी स्वतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उतरण्याची घोषणा केली आहे.

राज्यात सहा ठिकाणी उमेदवार देणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी यांनी ही निवडणूक (Election) पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे म्हटले आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली रणनीती स्पष्ट केली.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com