Rahul Gandhi News : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून राहुल गांधींची संरक्षण समितीवर नियुक्ती

Parliamentary Standing Committee : राहुल गांधी यांची या समितीवर पुन्हा निवड झाल्यामुळे काँग्रेसला बळ मिळाले आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Congress News : लोकसभेचे सदस्यत्व परत मिळाल्यानंतर काही दिवसांनीच काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांना संरक्षणविषयक संसदीय स्थायी समितीवर नामनिर्देशित करण्यात आले. बुधवारी (१६ ऑगस्ट) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांच्याकडून राहुल गांधी यांची नियुक्ती करण्यात आली. या संदर्भात लोकसभा सचिवालयाकडून पत्र काढण्यात आले.

मोदी आडनावावरील टिप्पणीशी संबंधित एका प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मार्च महिन्यात गुजरातच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली होती. खासदारकी रद्द झाल्यानंतर या समितीतून राहुल गांधी यांना वगळण्यात आले होते. खासदारकी परत मिळाल्यानंतर त्यांची पुन्हा या समितीवर निवड करण्यात आली आहे.

Rahul Gandhi
Sharad Pawar News : 'शिवसेनेच्या चिन्हाबाबत केंद्रातील शक्तिशाली घटकांनी हस्तक्षेप केला'; पवारांचा इशारा कुणाकडे ?

या प्रकरणी 4 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राहुल गांधींना मोठा दिलासा देत त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. राहुल गांधी यांची या समितीवर पुन्हा निवड झाल्यामुळे काँग्रेसला बळ मिळाले आहे. संसदेतील संरक्षण समिती अत्यंत महत्त्वाची समिती आहे. काँग्रेसचे खासदार अमरसिंह यांचीही समितीवर निवड करण्यात आली आहे.

सदस्यत्व परत मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही भाग घेतला होता. मणिपूरच्या हिंसाचारावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकावर अविश्वास प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावर बोलतना राहुल गांधी यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.

Rahul Gandhi
India Alliance News: 'इंडिया आघाडी'वर केजरीवाल नाराज? मुंबईतील बैठकीला 'आप' अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा

दरम्यान, लोकसभा सचिवालयाच्या वतीने आम आदमी पक्षाचे नवनिर्वाचित लोकसभा सदस्य सुशील कुमार रिंकू यांचीही कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीवर नियुक्ती करण्यात आली. सुशील कुमार रिंकू यांनी अलीकडेच जालंधर लोकसभा पोटनिवडणूक जिंकली आहे. ते लोकसभेतील एकमेव आपचे सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे फैजल पी.पी. मोहम्मद, यांनाही ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण समितीवर घेण्यात आले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com