Om Birla|
Om Birla|Sarkarnama

Lok Sabha Speaker Om Birla : असं न कराल तर चांगलं राहील; लोकसभा सभापतींचा खासदारांना इशारा

Lok Sabha Speaker Om Birla : लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली
Published on

Lok Sabha Speaker Om Birla : सध्या दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनामध्ये लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी खासदारांना इशारा दिला आहे. खासदारांनी लोकसभा (Parliament of India) सभापतींच्या विरोधात केलेल्या टिप्पण्यांच्या विषयावर ते बोलत होते.

लोकसभेत आपल्याला बोलू दिले जात नाही अशी तक्रार करणे, ती देखील ट्विटर नामक मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटवर, या प्रकारांविरूध्द लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

काही खासदारांनी (Lok Sabha House of the People) आपल्या म्हणजे लोकसभेच्या सभापतींच्या विरोधात केलेल्या टिप्पण्यांबद्दल त्यांनी ‘असे न कराल तर ते चांगले राहीलल' अशा शब्दांत इशारा दिला. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान खासदारंना हा इशारा देताना बिर्ला यांनी थेटपणे कोणाचेही नाव घेतले नाही.

परंतु तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool congress) महुआ मोईत्रा यांनी मुलकी विमान वाहतूक मंत्रालयाशी संबंधित एक प्रश्न मांडल्यावर लगेचच म्हणजे मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना उत्तर देण्यास सांगण्यापूर्वीच बिर्ला यांनी ही टिप्पणी केली आणि आपण नेमके ‘कोणाबद्दल' बोलत आहोत हेही अप्रत्यक्षपणे सांगून टाकले.

 Om Birla|
Patan : बाळासाहेबांच्या शिवसेनेचे १६१ सदस्य, १८ सरपंच बिनविरोध... शंभूराज देसाई

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान यंदा फेब्रुवारीमध्ये मोईत्रा यांनी पीठासीन अधिकाऱ्यांवर आपल्याला बोलण्याची संधी न दिल्याचे आरोप केले होते. त्यांनी ट्विटरवरही अशीच टिप्पणी केली होती. त्या अधिवेशनातही मोइत्रा यांच्या वागणुकीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना बिर्ला यांनी सभागृहात कठोर भूमिका घेतली होती.

संसदीय सभागृहाच्या (Parliament) आत आणि बाहेर पीठासीन अधिकाऱ्यांवर असे भाष्य करणे हे सभागृहाच्या प्रतिष्ठेचे आणि शिष्टाचाराचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते आणि सोशल मीडियावरून असे भाष्य करणे टाळले पाहिजे असेही ते म्हणाले होते. बिर्ला यांच्या मनातून याबद्दलची नाराजी अजून गेली नसल्याचे दिसते. (Parliament of India Lok Sabha House of the People)

 Om Birla|
Job Vacancy for Transgender : तृतीय पंथीयांना सध्या तरी 'या' पदांच्या भरतीतच संधी...

कारण हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा याबद्दल खासदारंना कानपिचक्या दिल्या. निमित्त होते अर्थातच मोईत्रा! बिर्ला म्हणाले की मी सर्वपक्षीय सदस्यांना बोलण्यासाठी पुरेसा वेळ देत असतो. मात्र जेव्हा खासदारांना बोलण्याची संधी मिळत नाही तेव्हा ते ट्विटरवर तक्रारी करू लागतात की स्पीकरनी त्यांना बोलण्यासाठी वेळ किंवा संधी दिली नाही.

कोणत्याही खासदाराचे नाव न घेता बिर्ला पुढे म्हणाले की "माझी एकच विनंती आहे की मी सर्व सदस्यांना (सभागृहात) बोलण्याची संधी द्यावी...तशी ती मिळतेही. परंतु अनेक सन्माननीय सदस्यांनी ट्विटरवर पटकन लिहिले की सभापतींनी आम्हाला बोलण्याची संधी दिली नाही. ट्विटरवर सभापतींबद्दल असे कधीही लिहू नका. छान होईल. हे किमान लक्षात ठेवा. बिर्ला यांच्या इशाऱ्यानंतर पहिल्या बाकावर बसलेल्या मोईत्रा यांचा आवाज शांत झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com