BJP News: तीन राज्याच्या विधानसभा जिंकल्यानंतर भाजपचा पुढचा प्लॅन ठरला; नव्या मिशनची घोषणा

Narendra Modi and Amit Shah: आगामी निवडणुकीबाबत रणनीती ठरवत भाजपने एका नव्या मिशनची घोषणा केली.
Narendra Modi and Amit Shah
Narendra Modi and Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोट बांधणीला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच 'इंडिया आघाडी'ची दिल्लीत बैठक पार पडली. तर दुसरीकडे एनडीए (NDA) ची देखील महत्वाची बैठक पार पडली होती. यानंतर आता आगामी निवडणुकीबाबत रणनीती ठरवत भाजपने एका नव्या मिशनची घोषणा केली आहे.

'आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 50 टक्के मते मिळण्याचे लक्ष्य ठेवा', अशा सूचनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रीय पदाधिकारी व प्रदेश नेत्यांचं शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान मोदी आणि शाह यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi and Amit Shah
Prashant Kishor News : प्रशांत किशोर आंध्र प्रदेशच्या राजकारणात परतले, चंद्राबाबूंशी 3 तास चर्चा...

"भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं लक्ष्य समोर ठेवून 'मिशन मोड'वर काम करायचं आहे. सर्वच्या सर्व लोकसभा जागांवर 50 टक्के मते मिळण्याचे उद्दिष्ट ठेवायचे आहे. मात्र, हे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपला नव्या मतदारांपर्यंत पोहोचवावं लागणार आहे. तसेच बुथ स्तरावर जास्तीत जास्त सक्रिय व्हा", अशा सूचना मोदींनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.

"या बरोबरच मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 40 टक्के मते मिळवत 303 जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता मतांच्या टक्केवारीत 10 टक्क्यांची वाढ ठेवण्याचं उद्दिष्ट ठेवत लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याचे मिशन ठेवायचं आहे, अशा नव्या मिशनची घोषणाच पंतप्रधान मोदींनी केली.

तसेच हे मिशन पूर्ण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या दोन दिवसांच्या बैठकीसाठी भाजपचे राष्ट्रीय सचिव-महासचिव, उपाध्यक्ष, सर्व प्रदेशाध्यक्ष, प्रभारी, विविध मोर्चाचे प्रमुख यांच्यासह सुमारे अडीचशे पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited By - Ganesh Thombare)

Narendra Modi and Amit Shah
Congress News : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; महाराष्ट्राचे प्रभारी बदलले, 'यूपी'तून प्रियांका गांधींना डच्चू

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com