भोपाळ : ''मूछें हो तो नत्थूलाल जैसी, वरना ना हों,'' हा शराबी चित्रपटातील डायलॉग सर्वांना आठवत असेल, पण मिशा ठेवणं एका पोलिसाला चांगलच महागात पडलं, लांब मिशांमुळे या पोलिस हवालदाराचा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तिरस्कार वाटू लागला अन् त्याला निलंबित करण्यात आले. पण सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात प्रशासनाला भाग पडलं.
पोलिस आणि लष्करातील कर्मचाऱ्यांमध्ये मिशा ठेवण्याची क्रेझ आहे. पण या आवडीमुळे निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले ते आहेत, भोपाळ (Bhopal) येथील राकेश राणा. ते हवालदार म्हणून कार्यरत होते. पण वरिष्ठांनी त्यांना मिशा काढण्याची सूचना दिली. पण त्यांनी त्याला नकार दिला, वरिष्ठांच्या या सूचनेला राकेश राणा यांनी (Rakesh Rana)केराची टोपली दाखवली. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले.
निलंबनावरून राकेश राणा म्हणाले, ''मी राजपूत कुटुंबातील असून मिशी हा आमचा स्वाभिमान आहे. मी माझ्या मिशा काढणार नाही. अधिकाऱ्यांना मिशा असू शकतात मग मला का नाही? मी माझे निलंबन स्वीकारतो,''
मिशीमुळे निलंबनाची कारवाई झालेले राकेश राणा रविवारी एका रात्रीत मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) चर्चेचा विषय झाले. विभागाचा हा आदेश आणि हवालदाराचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समाजमाध्यमांवर त्यांच्या या निलंबनावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली. त्यामुळे मध्यप्रदेश पोलिस प्रशासनाला माघार घ्यावी लागली. राकेश राणा यांना तीन दिवसांनंतर पुन्हा सेवत घ्यावे लागले, पण त्यांची बदली करण्यात आली.
मध्यप्रदेशाचे सहायक पोलिस महासंचालक प्रशांत शर्मा यांनी याबाबत एक आदेश प्रसिद्ध केला आहे. हा आदेश देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ''हवालदार राकेश राणा हे भोपाळ येथे पोलिस वाहन विभागाता कार्यरत आहेत. पोलिसांच्या गणवेशाला त्यांचा लुक शोभत नसल्यामुळे त्यांना निंलबित करण्यात आले होते. त्यांना पुन्हा सेवत घेण्यात आले आहे.
'भोपाळचे अभिनंदन'
राकेश राणा हे २००७ मध्ये पोलिस सेवत रुजू झाले. त्यांनी २०१० पासून ते मिशी ठेवण्यास प्रारंभ केला. १४ वर्षापासून ते मिशी ठेवत आहेत. हवाईदलातील ग्रुप कॅप्टन अभिनंदन यांच्यासारख्या त्यांच्या मिशा असल्यामुळे त्यांना ''भोपाळचे अभिनंदन'' म्हणून लोक ओळखतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.