भोपाळ : मध्य प्रदेशातील भाजप सरकारने सामान्य ज्ञानावरील एका स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेमध्ये रामायणाशी संबंधित प्रश्न असतील. स्पर्धेतील विजेत्यांना थेट विमानाने अयोध्याला जाण्याची संधी मिळणार आहे. अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराच्या ठिकाणी या स्पर्धकांना जाता येईल, असे मध्य प्रदेशच्या पर्यटन व सांस्कृतिक मंत्री उषा ठाकूर यांनी जाहीर केले.
स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर केले जाणार आहे. पण ही स्पर्धा कधी होणार, त्यातून किती विजेते काढले जाणार याबाबत ठाकूर यांनी माहिती दिली नाही. स्पर्धेतील विजेत्यांना मात्र अयोध्येला जाण्यासाठी विमान प्रवासाचे तिकीट दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. रामचरितमानस यावर आयोजित एका सामान्य ज्ञान स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, मागील महिन्यात मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी उच्च शिक्षणामध्ये रामचरितमानस या विषयाचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील सर्व महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये कला शाखेतील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी हा पर्यायी विषय असेल. तसेच सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पात 'राम वन गमन पथ' या प्रकल्पासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
हा प्रकल्प मध्य प्रदेश सरकारच्या अध्यात्मिक विभाग आणि रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. याअंतर्गत चित्रकूट ते अमरकंटकदरम्यानचा रस्ता तयार केला जाणार आहे. सटना, पन्ना, अमनगंज, कटनी, जबलपूर, मांडला, दिंडोरी आणि शाहडोल जिल्ह्यातून हा रस्ता जाईल.
विधानसभेच्या मागील निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसनेही 'राम वन गमन पथ' या प्रकल्पाची घोषणा केली होती. पण काँग्रेसला सत्तेत फारकाळ राहता आले नाही. भाजपने काँग्रेसचे सरकार पाडत सत्ता स्थापन केली. त्यानंतर काही दिवसांतच या योजनेवर काम सुरू केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.