Mahadev Betting App Case: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; छत्तीसगडमध्ये गाजलेल्या महादेव बेटिंग अ‍ॅपवर बंदी

Chhattisgarh Election PM Modi Target Mahadev Betting App Scam: महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणावरून छत्तीसगडमध्ये चांगलंच राजकारण तापलं आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News: छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महादेव बेटिंग'अ‍ॅप'चा मुद्दा चांगलाच गाजला. महादेव बेटिंग अॅप प्रकरणात अॅपच्या प्रवर्तकांनी भूपेश बघेल यांना आतापर्यंत 508 कोटी रुपये दिल्याचा खुलासा ईडीने केला. त्यामुळे छत्तीसगडमध्ये जोरदार राजकारण तापलं. मात्र, आता याच महादेव बेटिंग 'अ‍ॅप'सह आणखी 22 अ‍ॅपवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबतची अधिसूचना रविवारी जारी केली. या महादेव बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून बेकायदेशीर सट्टेबाजी होत असल्याचा दावा ईडीने केला होता, तसेच या अ‍ॅपवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्र सरकारला पत्रही दिलं होतं. यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत महादेव बेटिंग अ‍ॅप 'अ‍ॅप'सह 22 अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narendra Modi
ST Workers Strike: एसटी कर्मचाऱ्यांना गंडवले ? विरोधक सत्ताधारी झाले, मात्र एसटीचे विलीनीकरण रखडलेलेच...

सध्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारात नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करताना महादेव बेटिंग अ‍ॅपचा मुद्दा चांगलाच गाजला. याबरोबरच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना अॅपच्या प्रवर्तकांनी तब्बल 508 कोटी रुपये दिल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला. आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पण या प्रकरणावर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हे आरोप फेटाळून लावत यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो, संबंधित व्यक्तीवर दबाव टाकून त्याला माझी प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी भाग पाडले जात असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

तसेच लोकांनी निवडून दिलेल्या काँग्रेस सरकारला बदनाम करण्याचा हा राजकीय डाव असल्याचा आरोपही मुख्यमंत्री बघेल यांनी भाजपवर केला होता, तर यानंतर पंतप्रधान मोदींनीही मुख्यमंत्री बघेल यांच्यावर या प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला होता.

छत्तीसगडला लुटण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नसून काँग्रेसने महादेवाचं नावही सोडलं नाही, अशी खोचक टीका पंतप्रधान मोदींनी केली होती. तसेच छत्तीसगड राज्यात भाजपचं सरकार आल्यावर सर्व घोटाळ्यांची कसून आणि सखोल चौकशी केली जाईल. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांची रवानगी तुरुंगात केली जाईल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

Edited By - Ganesh Thombare

Narendra Modi
PhD on Modi : वाराणसीच्या नजमा परवीन ठरल्या पंतप्रधान मोदींवर 'PhD' करणाऱ्या पहिल्या मुस्लीम महिला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com