Maharashtra Live Updates : सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

Sarkarnama Headlines Updates : देशासह राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Maharashtra Live Updates
Maharashtra Live UpdatesSarkarnama

जिल्हा परिषद आरक्षण सोडतीआधी न्यायालयात  याचिका

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे गट आणि गण प्रारुप प्रभाग रचना अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे आरक्षण सोडत जाहीर होऊन लवकरच निवडणूक होईल, अशी शक्यता होती. मात्र, या शक्यतेला ब्रेक लागला आहे. सरकारच्या विरोधात आरक्षण सोडतीच्याआधीच नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे.

EWS आरक्षण रद्द करायचे का? छगन भुजबळ यांचा सवाल

मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ईडब्लूएसमधील आरक्षण नको का असा सवाल केला आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळत असताना ओबीसीतून आरक्षणाचा आग्रह का असा सवाल त्यांनी केला आहे.

Vice president oath ceremony : सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

भारताचे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ आज राष्ट्रपती भवनात पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राधाकृष्णन यांना पदाची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. सरन्यायाधीश गवई येथे देखील या समारंभाला उपस्थित होते.

Nitin Gadkari : पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम - नितीन गडकरी

केंद्रीय परिवहन आणि रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यावरून त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर उत्तर दिलं आहे. ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स सोसायटीच्या वार्षिक अधिवेशनात बोलताना ते म्हणाले, पैसे देऊन माझ्याविरुद्ध सोशल मीडियावर राजकीय मोहीम चालवली जात आहे. E20 मिश्रणाविरुद्धची सोशल मीडिया मोहीम ही राजकीयदृष्ट्या मला लक्ष्य करण्यासाठी पैसे देऊन केलेली मोहीम सुरू केल्याचा आरोप गडकरींनी केला आहे.

MNS-Shivsena UBT : नाशिकमध्ये आज राज अन् उद्धव ठाकरेंच्या सेनेचं शक्तीप्रदर्शन

महापालिका निवडणुकीसाठी भाजपने केलेल्या फोडाफोडीला आज शिवसेना-मनसे युती पहिला धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेना आणि मनसे नाशिक शहराच्या प्रश्नावर आज महामोर्चा काढत आहे. नाशिक शहरातील वाढलेली गुन्हेगारी आणि महापालिकेच्या भ्रष्टाचारा विरोधात सातत्याने आवाज उठविला जात आहे. भाजपच्या महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून वादग्रस्त नेत्यांना संरक्षण देण्याच्या धोरणाला शिवसेना मनसे आज आव्हान देणार आहे. खासदार संजय राऊत, माजी आमदार बाळा नांदगावकर यांचं शिवसेना आणि मनसेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मोर्चाद्वारे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजप टार्गेट असेल.

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ आज लातूर दौऱ्यावर

मंत्री छगन भुजबळ यांनी नियोजित येवला दौरा रद्द केला असून आज ते लातूर दौऱ्यावर जाणार आहेत. ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीत भरत महादेव कराड यांनी आत्महत्या केली आहे. तर कराड यांची कुटुंबियाची भेट घेण्यासाठी ते आज रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात जाणार आहेत.

Acharya devvrat : आचार्य देवव्रत असणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला असून ते आज भारताचे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. त्यामुळे त्यांची जागी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली असून आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.

C. P. Radhakrishnan : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा आज शपथविधी समारंभ

भारताचे नवे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा शपथविधी समारंभ आज राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राधाकृष्णन यांना पदाची शपथ देणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. यामध्ये कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया, झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com