Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात 'नो एट्री'

'महाराष्ट्रातील काही नेते मंडळी बेळगावात येणार असतील तर त्यांना वेळीच रोखले जाईल'
Maharashtra-Karnataka
Maharashtra-KarnatakaSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : सध्या महाराष्ट्र (Maharashtra) - कर्नाटक (Karnataka) सीमावादाच्या प्रश्नावर वेगवान घडामोडी घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्याच्या सीमेवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सीमेवर मोठा पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

''महाराष्ट्रातील काही नेते मंडळी बेळगावात (Belgaum) सार्वजनिक कार्यक्रम अथवा कायदा व सुव्यवस्था बिघडेल, असे वक्तव्य करण्यासाठी येत असतील तर त्यांना वेळीच रोखले जाईल'', असा इशारा कर्नाटकचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी दिला आहे.

महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाच्या (border dispute) प्रश्नावर उद्या (दि.३० नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर दोन्ही राज्याच्या सीमेवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आंतरराज्य पोलिसांनी बैठक घेत दोन्ही राज्याच्या सीमेवर मोठा पोलीस (Police) बंदोबस्त तैनात केला आहे.

Maharashtra-Karnataka
Police Recruitment : पोलिस भरतीसाठी अर्ज करण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

या बैठकीनंतर पोलीस महासंचालक आलोक कुमार (Director General of Police Alok Kumar) म्हणाले, '' गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमाप्रश्नावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. यामध्ये बसेससह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. याप्रकरणाची चौकशी सुरू असून दोषीवर कारवाई करण्यात येणार आहे'', असं त्यांनी सांगितलं. (Karnataka-Maharashtra Police Meeting at Nipani)

Maharashtra-Karnataka
PCMC News : रिक्षाचालकांच्या आंदोलनाचा दणका; बेकायदेशीर बाईक टॅक्सी कंपनीविरुद्ध पोलिसांची कारवाई

''दोन्ही राज्याच्या सीमाभागातील चेक पोस्टवर (Check post) विशेष नजर राहणार आहे. तसेच विशेषतः निपाणी, कोगनोळी, कागवाड, संकेश्वर या भागातील चेक पोस्टवर विशेष नजर राहणार आहे. सध्या तरी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात १४४ कलम लागू करण्याची आवश्यकता नाही. बुधवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर शाळा, महाविद्यालये (Colleges), बस (Bus) सुविधा व इतर व्यवस्थेबाबत विचार करून निर्णय घेऊ'', असं आलोक कुमार यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे दोन्ही राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमावादाचा प्रश्न निकाली निघणार का? हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com