Bharat Jodo Yatra: 'भारत जोडो यात्रेत' राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दांडी ; आघाडी विखुरली ?

Bharat Jodo Yatra : राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण राष्ट्रवादीचा एकही बडा नेता या यात्रेत सहभागी नव्हता.
Sharad Pawar,Rahul Gandhi
Sharad Pawar,Rahul Gandhisarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी, मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एक किमान समान कार्यक्रम (कॉमन मिनिमम प्रोग्रॅम) ठरवला आणि तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारची (Maha Vikas Aghadi Government) स्थापना झाली होती. (Bharat Jodo Yatra latest news)

काँग्रेसने या आघाडीत सामील होण्यासाठी स्वारस्य दाखवलं नव्हतं. पण पुढे तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तिन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी 'कॉमन मिनिमम प्रोग्रॅम' हाच पाया म्हणून ओळखला जातो.पण या कार्यक्रमातून आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठ फिरवल्याची चर्चा आहे. ठाकरे सरकार पडताचं या 'कॉमन मिनिमम प्रोग्रॅम'चा सुर बदलला की काय अशी शंका निर्माण झाल्याचे चित्र आहे. ठाकरे सरकार बरखास्त होताच राष्ट्रवादीने या आघाडीतून काढता पाय घेतला आहे का, अशी शंका विचारण्यात येत आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सध्या भारत जोडो यात्रा सुरु आहे. भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला आगमन होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.'भारत जोडो यात्रे'च्या पार्श्वभूमीवर मुंबईतही (Mumbai Congress)काल (रविवारी) 'भारत जोडो यात्रा' काढण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण सुमारे दीडशे कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले नाहीत, राष्ट्रवादीचा एकही बडा नेता या यात्रेत सहभागी नव्हता.

Sharad Pawar,Rahul Gandhi
NCP : पडळकर, भाजपच्या डबक्यात बसून डराव- डराव करणं बंद करा ; विद्या चव्हाणांचा टोला

काल गांधी जयंती निमित्त मुंबई कॉग्रेसकडून वतीने "नफरत छोडो, भारत जोडो" यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेला काल मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरुवात झाली असून मंत्रालयासमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ या यात्रेची सांगता करण्यात आली. मुंबई काँग्रेसच्या या यात्रेत सीपीआय (CPI), शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) तसेच महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचाही सहभाग होता. पण या यात्रेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही बड्या नेत्याचा सहभाग दिसला नाही. या यात्रेत सामील होण्याच्या नावाखाली राष्ट्रवादीचे केवळ 100-150 कार्यकर्तेच होते.

राष्ट्रवादीच्या या सावध भुमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. ऐक्याचा नारा देणारी महाविकास आघाडी विखुरली आहे का, असा सवाल भाजपचे नेते विचारत आहेत. राष्ट्रवादीचं या यात्रेत सहभागी न होणं यामागे राष्ट्रवादी काय कारण किंवा रणनीती असू शकते, याबाबत तर्क-वितर्क करण्यात येत आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी कर्नाटक येथे 6 ऑक्टोबर रोजी ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार आहेत. तामिळनाडू, केरळनंतर राहुल यांची यात्रा शुक्रवारी कर्नाटकात दाखल झाली. ही यात्रा कर्नाटकात 21 दिवस चालणार असून 511 किमी प्रवास करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com