NCP : पडळकर, भाजपच्या डबक्यात बसून डराव- डराव करणं बंद करा ; विद्या चव्हाणांचा टोला

NCP : गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही.
Gopichandr Padalkar, Vidya Chavan
Gopichandr Padalkar, Vidya Chavansarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichandr Padalkar) यांनी दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर टीका केली होती, ओबीसी आरक्षणावरुन पडळकर यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.पडळकर माध्यमांशी होते. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

विद्या चव्हाण यांनी टि्वट करीत पडळकरांवर तोफ डागली आहे. त्या आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "आपल्याला अक्कल नसेल तर वाचाव ,अभ्यास करावा संपूर्ण माहिती नसेल तर काही तरी बरळण, लोक वेडा म्हणतील...धनगरसमाजाला विचार OBC ना विचार ,भाजपा काय आहे ते..उगाच भाजपा त्या डबक्यात बसून ड्राव डराव करणे बंद कर,"

पडळकर म्हणाले, "राष्ट्रवादी अनेक वर्ष राजकारणा सक्रिय आहे, पण इतर राज्यात ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांनी स्वबळावर सत्ता आणली, तशी सत्ता पवारांना राज्याच आणता आली नाही. स्वबळावर, कुणाच्याही पाठिंब्याशिवाय त्यांना सत्ता मिळवता आली नाही, त्यांना तीन अंकी आमदारही निवडणूक आणता आले नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता नवीन काही विषय राहिले नाही. त्यामुळे ते असे विषय उकरुन काढत आहेत, " " शरद पवार हे धनगर समाजाचे शत्रू आहेत, अशी गंभीर टीका त्यांनी केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबावर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पडळकरांनी जेजुरीमध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा ते म्हणाले, "शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीच्या हस्ते अनावरण ही अपमानास्पद बाब आहे. अहिल्यादेवींच्या विचारांच्या उलट शरद पवार यांचं काम आहे. त्यांनी आपले हात अहिल्यादेवींच्या पुतळ्याला लावू नयेत."

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असंही वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com