Praful Patel News : प्रफुल्ल पटेल कसे बनले पवारांचे निकटवर्तीय ? ; NCPचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पद, सहा वेळा खासदार..

Who is Praful Patel : मनोहर पटेल हे यशवंतरावांचे विश्वासू सहकारी होते..
Who is Praful Patel  news
Who is Praful Patel newsSarkarnama
Published on
Updated on

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीतील दुसऱ्या क्रमांकाचे पद सुळेंसह पटेल यांना मिळालं. यामुळे पटेल हे पवारांचे विश्वासू आणि निकटवर्तीय नेते असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुळे आणि पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सहा वेळा खासदार झालेले प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांचे कसे निकटवर्तीय बनले, हे जाणून घेऊन या!

Who is Praful Patel  news
Maharashtra politics : गुलाबराव पाटलांना मंत्रीपदावरुन काढणार ? खडसेंनी सांगितलं कारण , 'जलजीवन मिशन योजनेत..'

कोण आहेत प्रफुल्ल पटेल ?

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९५७ मध्ये कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील मनोहरभाई पटेल हे मोठे उद्योगपती होते. इंदिरा गांधी आणि मोराजजी देसाई यांचे निकटवर्तीय म्हणून मनोहरभाई पटेल यांची ओळख होती. याशिवाय ते गोंदिया विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

Who is Praful Patel  news
Shivsena News : 'त्या' दोन्ही महिला नेत्यांची शिवसेना शिंदे गटातून हाकालपट्टी ! ; पक्षाची शिस्त मोडल्याने..

पटेल कसे बनले पवारांचे निकटवर्तीय

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशंवतराव चव्हाण यांना शरद पवार हे गुरु मानते होते. प्रफुल्ल पटेल यांचे वडील मनोहर पटेल हे यशवंतरावांचे विश्वासू सहकारी होते. शरद पवार जेव्हा यशवंतराव चव्हाण आणि मनोहर भाई पटेल यांना भेटण्यासाठी जात असत तेव्हा प्रफुल्ल पटेल हे नेहमी उपस्थित असत.

प्रफुल्ल हे नेहमीच वडीलासोबत राजकीय बैठकांना जात होते. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांची जवळीक वाढली. मनोहर पटेल यांचे निधन झाले होते तेव्हा प्रफुल्ल हे तेरा वर्षांचे होते. काही वर्षानंतर त्यांनी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात एन्ट्री घेतली.

Who is Praful Patel  news
Sharad Pawar News : शरद पवारांनी अखेर भाकरी फिरवली ; सुप्रिया सुळे, पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी..

चार वेळा लोकसभा आणि तीन वेळा राज्यसभेचे खासदार..

राजकारणात प्रवेश करताच प्रफुल्ल पटेल हे २८ व्या वर्षी गोंदिया नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. त्यानंतर ते ३३ व्या वर्षी १९९१ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली, ते निवडणूक आले. त्यानंतर ते सलग दोन वेळा खासदार झाले. २००९ मध्ये त्यांनी चौथ्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली. ते सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री झाले. २०००, २००६ आणि २०२२ मध्ये ते राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com