
Eight jawans Martyred in Chhattisgarh : छत्तीसगडमधील बीजापुरमध्ये जवानांच्या वाहनावर मोठा नक्षली हल्ला झाला आहे. प्राप्त माहितीनुसार या हल्ल्यात आठ जवान शहीद झाले आहेत तर याशिवाय एक नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या वाहनात डीआरजी या डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे जवान सवार होते. ज्यांना निशाणा बनवत नक्षीलींना आयडी ब्लास्ट केला.
अशी माहिती समोर आले आहे की, विस्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा जवानाच्या वाहन ताफ्याजवळ स्फोट घडवण्यात आला. ज्यामुळे वाहनाच्या अक्षरशा चिंधड्या उडाल्या. हा हल्ला एवढा भीषण होता की, स्फोट घडला त्या जागी मोठा खड्डा देखील पडला.
जवानांवर नक्षलींनी(Naxal) हल्ला अशावेळी केला. जेव्हा त्यांची एक नक्षलविरोधी मोहीम सुरू होती. दरम्यान, बीजापूरमध्ये जवानांचे एक पथक आपली मोहीम पूर्ण करून परत येत होते, तेव्हा नक्षलींना त्यांना निशाणा बनवले. जवानांची टीम कुटर ठाणे हद्दीतील अंबेली गावाजवळ पोहचली होती. ते कुटरू-बेद्रे मार्गावर असताना त्यांच्यावर हल्ला केला गेला. हल्ल्यात शहीद होणाऱ्यांमध्ये डीआरजीचे आठ जवान आणि एका वाहनचालकाचा समावेश आहे.
बस्तर रेंजचे पोलीस(Police) निरीक्षक जनरल सुंदरराज पी यांनी म्हटले की, कुटरू ठाणे हद्दीतील अंबेली गावाजवल तेव्हा घडली, जेव्हा जवान नक्षलविरोधी मोहिमेनंतर आपल्या वाहनाने परत येत होते. त्यांनी हेही सांगितले की, डीआरजी राज्य पोलिसांची एक शाखा आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, मागील दोन वर्षांत नक्षलींद्वारे जवानांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. या आधी 26 एप्रिल 2023 रोजी दंतेवाडा जिल्ह्यात जवानांना घेवून जाणाऱ्या एका वाहन ताफ्यातील वाहनाला नक्षलींनी स्फोटाद्वारे उडवलं होतं. ज्यामध्ये दहा पोलिस शहीद झाले होते, तर तेव्हाही एका चालकाचा मृत्यू झाला होता.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.