मल्लिकार्जुन खर्गे अॅक्शन मोडवर; अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच मोठी घोषणा

मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आज ता. (26) अधिकृतपणे काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष झाले.
Mallikarjun Kharge, Rahul Gandhi News
Mallikarjun Kharge, Rahul Gandhi Newssarkarnama
Published on
Updated on

Mallikarjun Kharge News : मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आज ता. (26) अधिकृतपणे काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष झाले. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी खर्गे यांच्याकडे अध्यक्ष पदाचा कार्यभार सोपवला. अध्यक्ष झाल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात खर्गे यांनी पक्षात 50 टक्के पदे 50 वर्षांखालील व्यक्तींना देण्याची मोठी घोषणा केली.

यावेळी बोलताना खर्गे म्हणाले उदयपूर अधिवेशनात पक्षातील 50 टक्के पदे 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना देण्याचा प्रस्ताव लागू केला जाणार आहे. तसेच आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक असल्याचेही त्यांनी सांगितले. आज एका सामान्य कार्यकर्त्याची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करून हा सन्मान दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

Mallikarjun Kharge, Rahul Gandhi News
Congress : 'भारत जोडो' साठी पवार, ठाकरेंना निमंत्रण; सहभागी व्हायचे की नाही ते....

आपण प्रत्येक आव्हानाशी एकत्र लढू, प्रत्येक खोटे उघड करू, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. सोनिया गांधी यांनी खर्गे यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवल्यानंतर आपल्याला दिलासा मिळाल्याचे सांगितले. त्यांच्या डोक्यावरून मोठे ओझे उतरले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सोनिया गांधी म्हणाल्या, मी पक्षाचे नवे अध्यक्ष खर्गे यांचे अभिनंदन करते. सर्वात समाधानाची बाब म्हणजे अध्यक्षपदी निवडून आलेले हे अनुभवी व तळमळीचे नेते आहेत. एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करत त्यांनी ही उंची गाठली आहे. तत्पूर्वी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी खर्गे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

Mallikarjun Kharge, Rahul Gandhi News
Mallikarjun kharge LIVE : मल्लिकार्जुन खरगेंनी अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला

शपथविधीसाठी एआयसीसी मुख्यालयात पोहोचण्यापूर्वी खर्गे यांनी राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर खर्गे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या समाधीवर गेले. तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि काँग्रेसचे नेते बाबू जगजीवन राम यांच्या समाधीवरही खर्गे यांनी पुष्प अर्पण केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com