Mallikarjun Kharge On Modi : 'पंतप्रधान मोदी म्हणजे विषारी साप'; वादानंतर खर्गेंनी घेतला 'यू टर्न..'

Mallikarjun Kharge On Narendra Modi Controversial Statement : तुम्ही त्यांना विष माना किंवा मानू नका, पण त्याचा स्वाद घेतला तर नक्की मराल.
Mallikarjun Kharge On Narendra Modi Controversial Statement :
Mallikarjun Kharge On Narendra Modi Controversial Statement :Sarkarnama

Mallikarjun Kharge On Narendra Modi Controversial Statement : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले. खर्गे म्हणाले, "मोदी हे विषारी सापासारखे आहेत. तुम्ही त्यांना विष माना किंवा मानू नका, पण त्याचा स्वाद घेतला तर नक्की मराल." भाजपने खर्गेंच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. (Karnataka Election 2023)

या विधानामुळे वाद निर्माण झाल्यानंतर आता खर्गेंकडून स्पष्टीकरण आले आहे. खर्गे म्हणाले, "भाजपची विचारधारा ही फूट पाडणारी, शत्रुत्वाची, गरीब आणि दलितांबद्दल द्वेष करणारी आहे. मी फक्त या द्वेष आणि द्वेषाच्या राजकारणावर चर्चा केली. मी मोदीबद्दल हे बोललो नाही. मी वैयक्तिक विधाने केली नाहीत. मला असे म्हणायचे आहे की, त्यांची विचारधारा ही विषारी सापासारखी आहे."

Mallikarjun Kharge On Narendra Modi Controversial Statement :
Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटलांची शिष्टाई; अकोले ते लोणी शेतकऱ्यांचा लाँग मार्च संगमनेरला स्थगित

यावर भाजपचे नेते व गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, "काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांसाठी 'विषारी साप' अशी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. खर्गे आणि काँग्रेसने विष पेरले. समाजातील विभाजनाचे विष, देशाच्या फाळणीचे विष, भ्रष्टाचाराचे विष, राजकारणातील घराणेशाहीचे विष - हे सर्व काँग्रेसने पेरलेले विष आहे."

Mallikarjun Kharge On Narendra Modi Controversial Statement :
Beed APMC News : मतदानाला आलात तर जिवंत सोडणार नाही, आमदार क्षीरसागर, खाडे, म्हस्के यांनी धमकावल्याचा आरोप..

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, "त्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसची निराशा दिसून येते. खर्गे यांचा व्हिडिओ ट्विट करत त्यांनी लिहिले, "आता काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी पंतप्रधान मोदींना 'विषारी साप' म्हटले. याची सुरुवात सोनिया गांधींच्या 'मौक का सौदागर'पासून झाली. आणि त्याचा शेवट कसा झाला हे आम्हाला माहीत आहे. काँग्रेस सतत खड्ड्यात उतरत आहे. कर्नाटकात काँग्रेसचा पराभव होत असल्याचे या निराशेतून दिसून येते आणि ते त्यांना माहीत आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com