Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeSarkarnama

Mallikarjun Kharge : '' राम मंदिराच्या उद्गघाटनाची घोषणा करण्याचा अधिकार अमित शाहांना कुणी दिला..?''

Mallikarjun Kharge On Amit Shah: या देशात प्रत्येकाची देवावर श्रद्धा आहे. मात्र, राम मंदिराची घोषणा अमित शाह हे का करत आहे ?

Mallikarjun Kharge On Amit Shah: भाजप नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्रिपुरातील भाजपाच्या ‘जनविश्वास’यात्रेत अयोध्या येथील राम मंदिराची उद्घाटनाची तारीख जाहीर केली. १ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराचं उद्घाटन होईल असं मोठं विधान शाह यांनी केलं आहे. शाह यांच्या विधानावरुन राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसनंही शाह यांच्या विधानावर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले, राम मंदिराची घोषणा अमित शाह का करत आहेत? त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा खडा सवाल देखील केला आहे.

काँग्रेसची 'भारत जोडो' यात्रा हरियाणात असून पानिपत येथे आहे.यावेळी झालेल्या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. खर्गे म्हणाले,अमित शाहांनी राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली आहे. पण राम मंदिराची घोषणा अमित शाह का करत आहेत? त्यांना हा अधिकार कोणी दिला? शाह हे राजकीय नेते असून पुजारी नाहीत. त्यांनी त्यांचं काम करावं आणि पुजारांना पुजाऱ्यांचं काम करू द्यावं अशा शब्दांत खर्गे यांनी शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

तसेच शाह हे मंदिराचे पुजारी आहेत की महंत ? या देशात प्रत्येकाची देवावर श्रद्धा आहे. मात्र, राम मंदिराची घोषणा अमित शाह हे का करत आहे असा सवालही उपस्थित केला आहे.

Mallikarjun Kharge
Eknath Shinde : "शिंदेनी नुसता दाढीवर हात फिरवला असता तर राऊत खासदारकीत आडवे झाले असते"

मोदी सरकार केवळ जुमला सरकार..

मोदी सरकार हे फक्त घोषणा करते. त्यांनी या आधी प्रत्येक नागरिकाला १५ लाख रुपयं देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसेच मात्र, त्याचं पुढं काय झालं माहिती नाही. याचवेळी त्यांनी मोदी सरकारच्या दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचं आश्वासन तरुणांना दिलं होतं, ते सुद्धा या सरकारनं पूर्ण केलं नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासनही हवेत विरलं आहे. त्यामुळे मोदी सरकार हे केवळ जुमला सरकार आहे अशी बोचरी टीकाही खर्गे यांनी केली आहे.

Mallikarjun Kharge
Gulam Nabi Azad : आझाद यांचं बंड थंड : तब्बल १७ नेत्यांनी साथ सोडत, पुन्हा धरला काँग्रेसचा 'हात'!

अमित शाह नेमकं काय म्हणाले होते?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्रिपुरातील सभेत बोलताना म्हणाले, मी २०१९ मध्ये भाजपचा अध्यक्ष होतो,तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी राहुल बाबा दररोज विचारायचे की, मंदिर वही बनाएंगे,लेकिन तारीख नहीं बताएंगे. राहुल गांधी आज कान उघडून ऐका. एक जानेवारी २०२४ ला अयोध्येतील राम मंदिर बांधकाम पूर्ण होऊन तयार असेल. तसेच काँग्रेसनं राम मंदिराचा मुद्दा बराच काळ न्यायालयात अडकवून ठेवला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिराच्या उभारणीचा रस्ता मोकळा झाला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या बांधकामाचं काम वेगानं पुढं नेलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com