New Delhi : 'इंडिया' आघाडीच्या 28 पक्षांची बैठक काल (19 डिसेंबर) दिल्लीत झाली. बैठकीच्या आधीच पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करा, आघाडीच्या समन्वयपदी नितीशकुमार यांचे नाव घोषित करा, अशा मागण्या होत होत्या. मात्र, ऐन बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड करण्याची मागणी केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील हीच मागणी लावून धरली.
या मागणीनंतर स्वतः मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यास स्पष्ट नकार दिला. आधी 'इंडिया' आघाडीचे खासदार निवडून आणू, मग उमेदवार ठरवू, असे खर्गे म्हणाले. पहिल्यांदा जिंकणे महत्त्वाचे आहे. जिंकलो नाही तर पंतप्रधानपदाची चर्चा करून काय उपयोग? असे देखील खर्गे म्हणाले.
'इंडिया' आघाडीच्या बैठकीच्या दिवशी दिल्लीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पोस्टर आघाडीचे समन्वयक म्हणून लागले होते. काही पोस्टरद्वारे नितीश कुमार यांची समन्वयकपदी निवड करण्याची मागणी देखील करण्यात येत होती. मात्र, बैठकीत समन्वयकपदाबाबत अजून घोषणा करण्यात आली नाही.
'इंडिया' आघाडीच्या बैठकीच्या आधी दिल्लीत आलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीचा समन्वयक नेमण्याची आवश्यकता असल्याचे तसेच शक्य असल्यास मोदींविरोधात एक चेहरासुद्धा द्यायला हवा, असे मत मांडले. मात्र, आता थेट पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचवले जात आहे. मात्र, त्यांनी नकार दिल्याने आता आघाडीच्या समन्वयकपदी देखील त्यांची वर्णी लागू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.