महादेवाची वेषभूषा करून महागाईविरोधात आवाज उठवला; भावना दुखावल्याचं कलम लावत अटक

हिंदू संघटनांकडून भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Man who played Lord Shiva in nukkad natak arrested for allegedly hurting religious sentiments
Man who played Lord Shiva in nukkad natak arrested for allegedly hurting religious sentimentsSarkarnama
Published on
Updated on

गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या काळात वाढलेल्या महागाईविरोधात गुवाहाटीमध्ये दोघांनी पथनाट्य सादर केले होते. यादरम्यान त्यांनी भगवान शंकर-पार्वतीची वेशभूषा केली होती. या नाट्यामध्ये त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटकही केली. (Assam Police Latest News)

बिरिंची बोरा असं या व्यक्तीचं नाव असून त्याच्यावर नगांवर सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पथनाट्यादरम्यान बोरा आणि त्याची सरकारी परिशमिती या दोघांनी शंकर-पार्वतीची वेशभूषा केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.

Man who played Lord Shiva in nukkad natak arrested for allegedly hurting religious sentiments
मोठी घडामोड : काँग्रेसच्या बैठकीला सात आमदारांची दांडी, काही आमदार भाजपच्या संपर्कात?

दोघेजण एका दुचाकीवरून आल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. दुचाकीमधील पेट्रोल अचानक संपल्याने त्यांची गाडी थांबते. त्यानंतर मग याचमुद्यावर दोघांमध्ये वाद सुरू होतो. मग भगवान शंकराकडून इंधनाच्या वाढत्या किंमती आणि इतर मुद्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला जातो. तसेच वाढत्या महागाईविरोधात सरकारविरोधात आंदोलन करण्याचं आवाहनही केल्याचे व्हिडीओमध्ये दिसते.

नाटिकेदरम्यान पार्वतीने हातातील डमरू व त्रिशूळ खाली फेकल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा अनेकांनी केला आहे. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून बोराला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला जामीनावर सोडून देण्यात आले.

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह इतर हिंदू संघटनांनी या पथनाट्याचा निषेध केला आहे. तर सोशल मीडियात पोलिसांनी केलेल्या कारवाईवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. केवळ वेशभूषा केली म्हणून भावना कशा दुखावल्या, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com