Manipur Assembly News: मणिपूर विधानसभेचे अधिवेशन अवघ्या ११ मिनिटांत अनिश्चित काळासाठी तहकूब

Manipur Assembly Session Adjourned: विधानसभेत गोंधळ झाल्यानंतर अधिवेशन तहकूब करण्यात आले
Manipur Assembly Session
Manipur Assembly SessionSarkarnama

Manipur Assembly Session : मणिपूर विधानसभेचे एकदिवसीय अधिवेशन सुरू झाल्यानंतर काही वेळातच गदारोळामुळे कामकाज तहकूब करण्यात आले. परिस्थिती सामान्य असताना हे एक दिवसीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. विधानसभेचे हे अधिवेशन तीन महिन्यांनंतर घेण्यात आले होते. त्यामध्ये राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, फक्त 11 मिनिटात हे अधिवेशन तहकूब करण्यात आले.

मे महिन्यापासून राज्यात सुरू असलेल्या हिंसाचारात आता पर्यंत 170 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा स्थितीत विधानसभेचे हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे होते. कुकी-मोकी समाजाच्या 10 आमदारांनी अधिवेशनावर बहिष्कार टाकला होता. यामध्ये दोन मंत्र्यांचाही समावेश आहे. कुकी झोमी संघटनेने अधिवेशन वाढवण्याची मागणी सरकारकडे केली होती.

Manipur Assembly Session
Congress News : 'पराभवाच्या धास्तीने मोदी सरकारला महागाईची जाणीव ; गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्याने जनता फसणार नाही'

अधिवेशन सुरू झाल्यानंतर तासाभरातच काँग्रेसच्या (Congress) आमदारांनी विधानसभेच्या अधिवेशनाचा कालावधी पाच दिवस वाढवण्याची मागणी केली. गदारोळामुळे मणिपूर विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी सांगितले की, राज्यातील हिंसाचाराच्या सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी एक दिवस पुरेसा नाही.

सकाळी 11 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू झाले, तेव्हा 3 मे रोजी राज्यातील मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. राज्यातील जातीय सलोख्यासाठी सर्व मतभेद संवादाने आणि शांततेच्या मार्गाने सोडवले जावेत, असे सभागृहाने एका ठरावात म्हटले आहे.

Manipur Assembly Session
Mallikarjun Kharge News ''जब वोट लगे घटने, तो चुनावी तोहफ़े लगे बटने'' : खर्गेंनी ठेवले भाजपच्या वर्मावर बोट

"हे सभागृह जात, समुदाय, प्रदेश, धर्म किंवा भाषा यांचा विचार न करता सर्व लोकांच्या ऐक्यासाठी आणि सद्भावनेसाठी काम करण्याचा संकल्प करते." हे सभागृह संपूर्ण राज्यात शांतता प्रस्थापित होईपर्यंत लोकांमधील सर्व मतभेद संवादाने आणि घटनात्मक मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करेल, असे काही ठराव समंत करण्यात आले आहेत.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com