Gaurav Gogoi On Narendra Modi : मणिपूर जळतंय म्हणजेच भारत जळतोय; मोदींचे मौनव्रत तोडणारच; खासदार गोगाई जोरदार हल्लाबोल!

Parliament No Confidence Motion Live Updates: "जर मणिपूरची विभागणी झाली आहे तर भारताची विभागणी झाली आहे. आम्ही भारताचा मुद्द्यावर बोलत आहोत."
Parliament No Trust Motion Live Updates : Gourav Gogoi On Narendra Modi : Loksabaha
Parliament No Trust Motion Live Updates : Gourav Gogoi On Narendra Modi : LoksabahaSarkarnama
Published on
Updated on

Delhi Parliament News: मणिपूर प्रकरण, दिल्ली सेवा विधेयक यासह अनेक मुद्द्यांमुळे संसदेचे पावसाळी अधिवेशन आतापर्यंत वादळी ठरत आहे. आता हा गदारोळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास ठराव आणला आहे. याबाबत (मंगळवारी) आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाली असून, ती 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. आता या तीन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी शेवटच्या दिवशी उत्तर देण्याची शक्यता आहे.

दरम्यान लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस नेते व आसाममधील खासदार गौरव गोगोई म्हणाले, तुमच्या कार्यालयात पंतप्रधान मोदींसोबत काय चर्चा झाली ते आम्हाला सांगता का? या प्रश्नावर अमित शहा संतापून म्हणाले, तुम्हीच सांगा काय म्हणाले? हा गंभीर आरोप आहे. यानंतर सदस्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

Parliament No Trust Motion Live Updates : Gourav Gogoi On Narendra Modi : Loksabaha
Fadnavis On Jayant Patil: शाह - जयंत पाटलांच्या भेटीचं खुद्द फडणवीसांनीच केलं खंडन !

सभागृहात गोगाई म्हणाले, "ही आमची मजबूरी आहे की आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणावं लागलं. ही गोष्ट कधीही संख्याबळाची नाही. ही गोष्ट मणिपूरच्या न्यायाची होती. ही घटना ईशान्येच्या एका कोपऱ्यात घडत आहे असं समजू नका. मणिपूर जळत आहे तर हे फक्त मणिपूर नाही तर भारत जळत आहे. जर मणिपूरची विभागणी झाली आहे तर भारताची विभागणी झाली आहे. आम्ही भारताचा मुद्द्यावर बोलत आहोत."

आमची मागणी स्पष्ट होती की, पंतप्रधान मोदी देशाचे मुख्य आहेत, म्हणून त्यांनी सभागृहात त्यांनी यऊन, आपली भूमिका ठेवावी. आपली संदेदना व्यक्त करावी. मणिपूरला एक संदेश गेला पाहिजे की, या दुखद वेळी संपूर्ण सभागृह सोबत आहे. ही आमची अपेक्षा होती. मात्र दुर्दैवाने असं नाही झालं. मोदींनी मौनव्रत घेतलं. सभागृहात बोलणारच नाही अशी त्यांनी भूमिका घेतली. यामुळे आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणावं लागलं. या प्रस्तावाद्वारे आम्ही पंतप्रधानांचा मौनव्रत तोडणार आहोत, असे गोगाई म्हणाले.

Parliament No Trust Motion Live Updates : Gourav Gogoi On Narendra Modi : Loksabaha
NCP Crisis : पक्षांतर्गत कारवाई टाळण्यासाठी राष्ट्रवादीची मोठी चलाखी; ना शरद पवार गटाचा व्हीप, ना प्रफुल्ल पटेलांची हजेरी...

"मोदी मणिपूरला का गेले नाहीत? मोदी मणिपूर वर का बोलत नाहीत ? बोलले तर 37 सेकंद का एवढाच वेळ का बोलले? बाकी मंत्री बोलतील पण मोदी का बोलत नाहीत? मोदींनी मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का काढून टाकल नाही ? बाकी राज्यात आपण मुख्यमंत्री बदलले मग मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना का बदललं नाही?" अशा प्रश्नांचीही सरबत्ती गौरव गोगाई यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com