Fadnavis On Jayant Patil: शाह - जयंत पाटलांच्या भेटीचं खुद्द फडणवीसांनीच केलं खंडन !

Jayant Patil and Amit Shah meet : जयंत पाटील आणि अमित शाह यांची फडणवीसांच्या मध्यस्थीने भेट झाल्याची चर्चा होती.
Jayant Patil , Devendra Fadnavis, Amit Shah
Jayant Patil , Devendra Fadnavis, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Pune News: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. शाह रविवारी पुणे दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याचे बोलले जात होते. मात्र, यानंतर जयंत पाटलांनीच या सर्व चर्चा फेटाळत आपली कुणाशीही भेट झाली नसल्याचा खुलासा माध्यमांसमोर केला.

यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाह आणि जयंत पाटलांच्या भेटीचे खंडन केले. शाह आणि पाटलांमध्ये कुठलीही भेट झाली नसल्याचे स्पष्टीकरण फडणवीसांनी दिले.

Jayant Patil , Devendra Fadnavis, Amit Shah
Jayant Patil News: अमित शाहांची भेट घेतलीच नाही; जयंत पाटलांनी दावा खोडून काढला

"काही लोकांना अफवा उठवायला आवडतात. माध्यमांनी देखील खात्री करुन बातम्या दिल्या पाहिजेत. जयंत पाटील यांची कुठलीही भेट अमित शाह यांच्याशी झालेली नाही. जे पतंगबाजी करत आहेत, त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी देखील स्तर ठेवला पाहिजे. कन्फर्मेशन केल्यानंतरच अशा बातम्या दिल्या पाहिजेत", असे फडणवीस म्हणाले.

Jayant Patil , Devendra Fadnavis, Amit Shah
Amit Shah Pune Tour : मोदींच्या पाठोपाठ शाहांच्या दौऱ्यामुळे पुणेकरांची तारांबळ; वाहतूक कोंडींने हैराण

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडली. अजितदादा राष्ट्रवादीत बंड करत भाजपबरोबर सत्तेत सामील झाले. यानंतर आता जयंत पाटील हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली. मात्र, यानंतर स्वत: जयंत पाटलांनी खुलासा करत हे वृत्त फेटाळले. तर फडणवीसांनीही या भेटीचे खंडन केले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com