Manipur Women’s Violence Update : मणिपूर येथे घडलेल्या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदविण्यात येत आहे. सीबीआयकडून (CBI) मणिपूर घटनेबाबत तपास सुरु आहे. याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. सीबीआयने या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मणिपूरच्या घटनेचा तपास सुप्रीम कोर्टानं सीबीआयकडे दिला आहे.
या प्रकरणी सीबीआयने आपल्या तपासाची सुत्रे वेगाने फिरवली असून वेगवेगळ्या ठिकाणाहून लोकांना अटक करण्यात येत आहे. याबाबत केंद्राने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्या प्रतिज्ञापत्रात या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, असे म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने ही संपूर्ण प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, असं देखील केंद्र सरकारने या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
मणिपूर अडीच महिन्यापासून हिंसाचारात होरपळत आहे. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचे दिसते. समाज माध्यमातून या व्हिडिओवरुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचे तीव्र पडसाद अद्यापही देशभर उमटत आहेत.
ही घटना ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात घडली आहे. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचं सांगितलं.
Edited By : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.