Manish Sisodia यांच्यावर अटकेची टांगती तलवार ; CBI कडून पुन्हा समन्स

Manish Sisodia : "मनीष आणि सत्येंद्र हे आजचे भगतसिंह आहेत,कारागृहाच्या भिंती त्यांचा आवाज दाबू शकत नाही.
Manish Sisodia Latest News
Manish Sisodia Latest Newssarkarnama

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (manish sisodia) यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, सोमवारी त्यांना अटक होऊ शकते, असे 'आप'ने (AAP) म्हटलं आहे. सिसोदिया यांना मद्य गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (cbi)त्यांना हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे, सोमवारी (ता,१७) सीबीआय त्यांची पुन्हा चौकशी करणार आहे. सोमवारी अकरा वाजता सीबीआयने त्यांच्या कार्यालयात त्यांना चौकशीसाठी बोलवले आहे.

सोमवारी मनीष सिसोदिया यांच्या चौकशीनंतर त्यांना सीबीआय अटक करेल, असे 'आप'चे (AAP)राष्ट्रीय प्रवक्ता सौरभ भारद्वाज यांनी सांगितले आहे.गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे केले जात असल्याचा आरोप भारव्दाज यांनी केला आहे. मनीष सिसोदिया यांनी टि्वटमध्येही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

"माझ्या घरी सीबीआयने छापेमारी करुन १४ तास चौकशी केली. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. माझ्या गावात त्यांनी चौकशी केली, तेथे त्यांना काहीही मिळाले नाही, बॅंकेचे लॅाकर्स तपासले, त्या ठिकाणी त्यांना काही आढळले नाही.आता त्यांनी मला उद्या ११ वाजता बोलवले आहे. चौकशीत त्यांना मी पूर्ण सहकार्य करणार आहे," असे सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

मनीष सिसोदिया निवडणूक प्रचार अभियानासाठी गुजरातमध्ये आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही गेल्या दोन महिन्यात अनेक वेळा गुजरात येथे पक्षाच्या प्रचारासाठी जाऊन आले आहेत. मनीष सिसोदिया यांना अटक होईल, असे यापूर्वीही आपने सांगितले आहे. मात्र, सीबीआयने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Manish Sisodia Latest News
BJP : ठाकरेंनी घेतला धसका ; जेवतानाही त्यांना शिंदे-फडणवीसच दिसत असतील ; बावनकुळेंचा टोला

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी टि्वट करीत भाजपवर निशाणा साधला आहे. "मनीष आणि सत्येंद्र हे आजचे भगतसिंह आहेत,कारागृहाच्या भिंती त्यांचा आवाज दाबू शकत नाही, ही स्वातत्र्यांची दुसरी लढाई आहे. ७५ वर्षांनंतर देशाला सिसोदिया सारखा चांगला शिक्षणमंत्री मिळाला. गरीबांना शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत राहिल," असे टि्वट केजरीवाल यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com