Manish Sisodia News : जेलमधून मनीष सिसोदिया यांचा केंद्राला इशारा : ‘साहेब मला तुरुंगात टाकून....’

भाजपने सिसोदिया यांनी ट्विट कसे केले, त्यांच्याकडे तुरुंगात मोबाइल आहे का? असा सवाल उपस्थित केला हेाता.
Manish Sisodia
Manish SisodiaSarkarnama

नवी दिल्ली : ‘साहेब, तुरुंगात टाकून तुम्ही मला कष्ट पोहोचवू शकता. पण, तुम्ही माझे धैर्य तोडू शकत नाही, ब्रिटिशांनीही स्वातंत्र्यसैनिकांना त्रास दिला, पण त्यांचे धैर्य कमी झाले नाही. मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांचा तुरुंगातून संदेश,’ अशा शब्दांत दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्र सरकारला इशारा दिल्याचे मानले जात आहे. (Manish Sisodia's warning to central government from jail)

कथित अबकारी गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आलेली आहे. सध्या ते तुरुंगात असून त्यांच्या ट्विटरवरून ट्विट करत वरील इशारा दिला आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात त्यांनी मोदींना साहेब हा शब्द वापरला आहे.

Manish Sisodia
Jalgaon District Bank : संजय पवारांना उमेदवारी द्या, असे काँग्रेस-राष्ट्रवादीचे संचालक खडसेंना चार दिवसांपासून सांगत होते : गुलाबरावांचा गौप्यस्फोट

दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्या ट्विटरवरून होळीच्या संध्याकाळीही एक ट्विट करण्यात आले होते. त्यावर भाजपने सिसोदिया यांनी ट्विट कसे केले, त्यांच्याकडे तुरुंगात मोबाइल आहे का? असा सवाल उपस्थित केला हेाता.

तुरुंगातून लिहिले होते पत्र

तिहार तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देशाला खुले पत्र लिहिले होते. भाजपच्या केंद्र सरकारवर त्यांनी कट कारस्थानाचा आरोप केला हेाता. भाजप लोकांना तुरुंगात टाकण्याचे राजकारण करत आहे. आम्ही मुलांना शिकवण्याचे काम करत आहोत.

Manish Sisodia
Jalgaon District Bank : शिवसेना, काँग्रेसने आमचा विश्वासघात केला : जळगाव जिल्हा बॅंकेतील पराभवानंतर खडसेंचा आरोप

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा गुन्हा इतकाच आहे की त्यांनी पंतप्रधानांसमोर पर्यायी राजकारण निर्माण केले आहे, त्यामुळेच केजरीवाल सरकारमधील दोन मंत्री सध्या तुरुंगात आहेत. तुरुंगातील राजकारण यशस्वी झाले असे वाटेल, पण भारताचे भविष्य शालेय राजकारणात आहे. संपूर्ण देशाचे राजकारण तन, मन आणि धनाने शिक्षण क्षेत्राला पुढे नेण्याच्या कामात गुंतले असते, तर विकसित देशांप्रमाणे देशात प्रत्येक मुलासाठी चांगल्या शाळा उभ्या राहिल्या असत्या, असेही सिसोदिया यांनी आपल्या पत्रात म्हटले हेाते.

Manish Sisodia
Jalgaon District Bank Election : नगरनंतर जळगावातही राष्ट्रवादीला धक्का : जिल्हा बॅंक निवडणुकीत अधिकृत उमेदवाराचा पराभव

सत्तेच्या विरोधात उठलेला आवाज दाबला जात आहे

सरकारच्या विरोधात उठलेल्या प्रत्येक आवाजाला तुरुंगात पाठवून किंवा तुरुंगात पाठवण्याची धमकी देऊन सरकार चालवणे हे मोठ्या शाळा-कॉलेज उघडून चालवण्यापेक्षा खूप सोपे आहे. उत्तर प्रदेशच्या राज्यकर्त्यांना एका लोकगायिकेचे लोकगीत त्यांच्या विरोधात सापडल्यावर त्यांनी पोलिसांना नोटीस पाठवली आणि तिला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली. काँग्रेसच्या प्रवक्त्याने पंतप्रधानांबद्दल एक शब्द उच्चारला, तेव्हा दोन राज्यांच्या पोलिसांनी त्यांना फिल्मी पद्धतीने एका भयानक गुन्हेगाराप्रमाणे पकडले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com