Draupadi Murmu
Draupadi Murmusarkarnama

Droupadi Murmu यांना हटवा : सुप्रीम कोर्टात याचिका ; न्यायमूर्ती म्हणाले..

Supreme Court : "राष्ट्रपती पदासाठी मी अधिक पात्र आहेत. द्रौपदी मुर्मू यांना हटवून त्यांच्या जागी माझी निवड करा,"

Supreme Court : कारवार (कर्नाटक)मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनं राष्ट्रपतींना हटविण्याबाबत (President of India) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केल्यानं आश्वर्य व्यक्त करण्यात येत आहे. या व्यक्तीला राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्यापासून रोखण्यात आले होते. त्यानंतर या व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. राष्ट्रपतींना हटवून स्वतःला हे पद देण्याची मागणी केली. (Droupadi Murmu latest news)

किशोर सावंत असे या व्यक्तीचे नाव आहे. ते पर्यावरणवादी आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्यास ते इच्छुक होते, पण त्यांना त्यापासून रोखण्यात आले होते. त्यांच्या याचिकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने अशा याचिका भविष्यात दाखल करु नयेत, अशा शब्दात रजिस्ट्रीला खडसावले आहे. न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याला फटकारून ही निराधार याचिका इथपर्यंत पोहोचल्याचे आश्चर्य व्यक्त केले. याचिकेत लिहिलेल्या अवमानकारक गोष्टी रेकॉर्डमधून काढून टाकण्यात याव्यात,असेही न्यायालयाने सांगितले.

Draupadi Murmu
Sharad Pawar : शेलारांसोबत युती का केली ? : पवारांचे स्पष्टीकरण ; म्हणाले, 'ते काम आमचं..'

"राष्ट्रपतींच्या कार्याची नव्याने व्याख्या करावी, आपल्याला या पदावर बसवल्यास भारत आणि जगाच्या हिताचे काम करणार," असे त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. यासह सावंत यांनी सन 2004 पासून वेतन आणि भत्त्यांचीही मागणी केली आहे, कारण याआधी त्यांना नामांकन दाखल करण्याची परवानगी नव्हती.

"राष्ट्रपती पदासाठी मी अधिक पात्र आहेत. द्रौपदी मुर्मू यांना हटवून त्यांच्या जागी माझी निवड करा," अशी मागणी सावंत यांनी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ही याचिका अपमानास्पद आहे. भविष्यात अशा प्रकरणांची नोंद करू नये. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने या याचिकेवर तीव्र आक्षेप घेतला, असे असतानाही याचिकाकर्ते सावंत यांनी आपला युक्तिवाद सुरूच ठेवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com