Meghalaya Election 2023 : मोदींच्या रॅलीला मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नकार ; भाजपला दणका

Meghalaya Election 2023 : मोदींच्या रॅलीला परवानगी नाकारल्याने भाजपने संताप व्यक्त केला आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Meghalaya Election 2023 : मेघालयमध्ये येत्या २७ तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीचे (pm modi rally) आयोजन शिलॉग आणि तुरा येथे करण्यात आले होते. पण मोदींच्या या रॅलीला जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का समजला जात आहे.

मेघालयाच्या क्रीडा विभागाने पीए संगमा स्टेडियम येथे भाजपकडून होणाऱ्या मोदींच्या रॅलीला परवानगी नाकारली आहे. पीएम संगमा स्टेडियम हे मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या विधानसभा मतदारसंघात आहे. यास्टेडियममध्ये काम सुरु असल्याचे ते रॅलीसाठी देता येणार नाही, असे क्रीडा विभागाने भाजपला कळविले आहे. मोदींच्या रॅलीला परवानगी नाकारल्याने भाजपने संताप व्यक्त केला आहे.

Narendra Modi
Devi Singh Shekhawat Passed Away: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

"सत्ताधारी नॅशनल पीपुल्य पार्टी (एनपीपी), तृणमूल काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षानी एकत्रीतपणे हे षडयंत्र केले आहे. मेघालयात भाजपचा भगवा फडकू नये, यासाठी विरोधक एकत्र आले आहे," असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

आज (ता.२४) मोदींची येथे रॅली होती. शिलॉग आणि तुरा येथे मोदी प्रचारासाठी येणार होते. पीए संगमा स्टेडियमची परवानगी नाकारल्याने आता आलोटग्रे क्रिकेट स्टेडियम येथे ही रॅली होईल, असे भाजपच्या सुत्रांनी सांगितले आहे, पण अद्याप याबाबत निर्णय झालेला नाही.

दोन महिन्यापूर्वी या पीएम संगमा स्टेडियमचे उद्धघाटन झाले आहे, त्यासाठी १२७ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. पण अजून येथील काही काम अपूर्ण आहे, गैरसोय होऊ नये, म्हणून या रॅलीला परवानगी नाकारली असल्याचे समजते. पण शिलॉग येथे मोदींची आज रॅली होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com