ओमिक्रॉनला छोटा कोरोना म्हणणारे मेक्सिकोचे अध्यक्ष 24 तासांतच पॉझिटिव्ह

जगभरात कोरोना (Corona) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढत आहे.
Andrés Manuel López Obrador
Andrés Manuel López ObradorSarkarnama
Published on
Updated on

मेक्सिको सिटी : जगभरात कोरोना (Corona) विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढत आहे. मेक्सिकोतही (Mexico) कोरोना संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्रॅडोर (Andrés Manuel López Obrador) यांनी ओमिक्रॉनला छोटा कोरोना म्हटले होते. विशेष म्हणजे 24 तासांतच ते पॉझिटिव्ह आढळले आहेत.

मेक्सिकोचे अध्यक्ष ओब्रॅडोर यांनी मागील वर्षीही कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता संसर्ग झाल्याची माहिती त्यांनीच सोशल मीडियावर दिली आहे. मला सौम्य लक्षणे जाणवत असून, मी विलगीकरणात आहे. मी कार्यालयातूनच काम करेन आणि पुढील सूचनेपर्यंत सगळ्या बैठक रद्द करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. ओबॅडोर यांच्यासोबत दोन मंत्रीही पॉझिटिव्ह आले आहेत. देशात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असून, मागील आठवड्याच्या तुलनेत ही वाढ 186 टक्के आहे.

अध्यक्ष ओब्रॅडोर यांनी कालच ओमिक्रॉनला छोटा कोरोना असे म्हटले होते. ओमिक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि मृत्यू वाढले नसल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, तज्ञांनी त्यांचा या विधानाला आक्षेप घेतला होता. संसर्ग सुरू झाल्यानंतर काही आठवड्यांनीच यावर बोलणे योग्य ठरेल, असे तज्ञ म्हणाले होते. यानंतर आता 24 तासांतच अध्यक्ष ओब्रडोर पॉझिटिव्ह आले आहेत.

Andrés Manuel López Obrador
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनचा जगाला आठवडाभरात दुसरा धक्का

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नुकताच जगाला इशारा दिला आहे. संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अॅडहानॉम घेब्रेयेसिस म्हणाले आहेत की, ओमिक्रॉनची बाधा मोठ्या विक्रमी संख्येने होत आहे. अनेक देशांमध्ये डेल्टा प्रकाराला मागे टाकून ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. अनेक देशांमध्ये रुग्णालयांमध्ये जागा अपुरी पडू लागली आहे. डेल्टापेक्षा ओमिक्रॉन हा आता सौम्य वाटत आहे. विशेषत: लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये तो सौम्य आहे. याचा अर्थ असा नाही की तो सौम्य आहे.

Andrés Manuel López Obrador
सायना हैदराबादमध्ये तर सिद्धार्थ चेन्नईत अन् तपास करणार महाराष्ट्र पोलीस!

आधीच्या कोरोना विषाणूच्या प्रकारांप्रमाणे तो रुग्णांना रुग्णालयात पोचवत आहे आणि त्यांचे जीवही घेतोय. ओमिक्रॉनमुळे संसर्गाची सुनामी आली असून, ती अतिशय कमी कालावधीत आली आहे. जगभरातील आरोग्य यंत्रणा यामुळे कोलमडून पडल्या आहेत. मागील आठवड्यात 95 लाख नवीन कोरोना रुग्ण जगभरात नोंदवण्यात आले होते. त्याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत ही वाढ तब्बल 71 टक्के होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com