पुणे : रेल्वे मंत्रालय रेल कौशल विकास योजना (Rail Kaushal Vikas Yojana 2021-22) अंतर्गत युवकांसाठी अखिल भारतीय स्तरावर नामनिर्देशित प्रशिक्षण केंद्रावर लघु-अवधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम विविध ट्रेड अर्थात एसी मेकॅनिक, कारपेंटर, सीएनएसएस (कम्युनिकेशन नेटवर्क अँड सहायलन्स सिस्टीम), कॉम्प्युटर बेसिक्स, काँक्रेटिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रमेन्टेशन, फिटर्स, इन्स्ट्रमेंट मेकॅनिक | (इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स), मशिनिस्ट, रेफ्रीजरेशन अँड एसी, टेक्निशियन मेकॅट्रोनिक्स, ट्रॅक लेयिंग, वेल्डिंग इत्यादीमध्ये एंट्री लेव्हल कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे. हे प्रशिक्षण रोजगार मिळण्यामध्ये आणि स्वयं-रोजगारीत होण्यामध्येसुध्दा उमेदवारांना मदत करेल.
उमेदवार 15 नोव्हेंबर 2021 पासून ऑनलाईन अर्जाचे नमूने वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता किंवा नामनिर्देशित प्रशिक्षण केंद्रामधून प्राप्त करू शकता. उमेदवारांनी याच संस्थेच्या मदतीने विहित वेळेमध्ये ऑनलाईन सादर करावेत. ऑफलाईन नमूने मान्य करण्यात येणार नाही.
योजनेचे नाव – रेल कौशल विकास योजना
शैक्षणिक पात्रता – 10 वी पास
वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
निवड पध्दती – 10व्या वर्गामध्ये टक्केवारी ही निवड होण्याकरिता गुणवत्तेच्या आधारावर राहील. सीबीएसईने दिलेल्या सूत्रानुसार, टक्केवारीमध्ये सीजीपीए बदलण्याकरिता ९.५ ने सीजीपीएला गुणल्या जाईल.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 15 नोव्हेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2021
महत्वाची कागदपत्रे (Rail Kaushal Vikas Yojana Application)
(i)दहावीची गुणपत्रिका
(ii) दहावी प्रमाणपत्र (गुणपत्रिकेवर डी.ओ.बी. नमूद नसण्याचे बाबतीत)
(iii) छायाचित्र आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रतिमा (इमेज)
(iv) छायाचित्र ओळख पुरावा जसे आधारकार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, पॅन कार्डची प्रत इत्यादी.
महत्वाच्या लिंक
PDF जाहिरात
https://bit.ly/3FeAGhK
ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3cf6czO
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.