Mizoram Election Result 2023 : मिझोरम विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर येऊ लागला आहे. आकडेवारीनुसार नवख्या झेडपीएम पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे. सध्या मुख्यमंत्री पिछाडीवर असून उपमुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे एक्झिट पोलचा अंदाज मिझोरममध्येही सपशेल खोटा ठरण्याची शक्यता आहे.
मिझोरमचे उपमुख्यमंत्री तवनलुईया (Tawnluia) यांचा त्सुचंग मतदारसंघातून पराभव झाला आहे. येथून झेडपीएम उमेदवार डब्लू. चुअन्नव्वा यांनी सहा हजार 988 मते घेतली आहेत. तर तवनलुईया यांचा 909 मतांनी पराभव झाला आहे. त्यांना सहा हजार 79 मते मिळाली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री मैदानात असलेल्या ऐजवल पूर्व 1 मतदारसंघाकडे देशाचे लक्ष आहे. येथील मतमोजणीची शेवटची तिसरी फेरी सुरू आहे. यात मुख्यमंत्री झोरम थांगा पिछाडीवर आहेत. येथून झेडपीएमचे ललथांगसांगा 10727 मते घेत आघाडीवर आहे. मुख्यमंत्र्यांची जागाच धोक्यात आल्याने 'एमएनएफ'मध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'एक्झिट पोल'चे अंदाच चुकीचे
मिझोरममध्ये सत्तास्थापनेसाठी 21 जागांची आवश्यकता आहे. एक्झिट पोलनुसार राज्यातील सत्ताधारी एमएनएफ पक्षाला 40 पैकी 14 ते 18 जागा, झेडपीएमला 12 ते 16, काँग्रेसला 8 ते 10 तर भाजपला 0 ते 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली होती. आता एक्झिट पोलचे अंदाज मिझोरममध्येही चुकीचे ठरताना दिसत आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, राज्यात झेडपीएमला 27, एमएनएफला 10, भाजपला 2 तर काँग्रेस 1 अशा जागांवर आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.