Praniti Shinde News: बेळगावमध्ये राजकारण तापलं; आमदार प्रणिती शिंदेंची सभा उधळली

MLA Praniti Shinde : आमदार प्रणिती शिंदे यांची सभा उधळल्याने बेळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं
Praniti Shinde News
Praniti Shinde NewsSarkarnama

Karnataka Assembly Elections : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वच राजकीय पक्षाचा जोरदार प्रचार सुरू आहे.

या प्रचारादरम्यान नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. तर आज बेळगावजवळील देसूरमधील काँग्रेस उमेदवारासाठीची आयोजित सभा उधळून लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची काँग्रेस उमेदवारासाठी बेळगावजवळील देसूरमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही सभा उधळून लावण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

Praniti Shinde News
Eknath Shinde On Thackeray : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येतील का? मुख्यमंत्री म्हणाले...

मराठी भाषिकांनी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही कार्यकर्त्यांनी प्रणिती शिंदे यांची सभा उधळून लावली असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत स्पष्टीकरण कुणीही दिलेले नाही.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावजवळील देसूरमध्ये काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. पण मराठी भाषिकांनी जोरदार घोषणा देत सभा उधळून लावली आहे. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Praniti Shinde News
Ajit Pawar : अजित पवार 'रिचेबल'; 'नॉट रिचेबल'च्या अफवांनंतर दौराच जाहीर केला

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 10 मे ला मतदान पार पडणार आहे. तर 13 मे रोजी या निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com