राज्यात सध्या हनुमान चालिसा व भोंग्याच्या राजकीय वातावरणात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या व्यस्त राजकीय वेळापत्रकातून वेळ काढत सहकुटुंब अयोद्धा यात्रा केली.
आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांच्या समवेत पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले.
आमदार रोहित पवार यांनी त्यांंचे वडील राजेंद्र पवार व आई सुनंद पवार यांच्या समवेत राजस्थान राज्यातील पुष्कर येथे भेट देऊन ब्रम्हदेवाचे दर्शन घेतले.
अजमेर येथील सुफीसंत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याला आमदार रोहित पवार, राजेंद्र पवार व सुनंदा पवार यांनी भेट दिली. तसेच दर्ग्यावर माथा टेकविला.
आमदार रोहित पवार यांनी वाराणसी येथे जाऊन गंगा आरती केली. यावेळी त्यांच्या समवेत कुंती पवार, राजेंद्र पवार व सुनंदा पवारही होत्या.
वाराणसीतील गंगा आरतीसाठी जमलेला जनसमुदाय पाहताना आमदार रोहित पवार.
रोहित पवार यांनी पत्नी कुंती पवार यांच्या समवेत गंगा नदीत नौका विहाराचा आनंद घेतला.
रोहित पवार यांनी बनारस विद्यापीठातील ग्रंथालय व सयाजीराव गायकवाड राष्ट्रीय ग्रंथालयाला भेट दिली.
आमदार रोहित पवार यांनी वाराणसीत संत रोहिदास यांच्या मठालाही भेट दिली.
नौकेत बसून गंगेचे पूजन करताना आमदार रोहित पवार व कुंती पवार.
आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. यावेळी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांनी जीर्णोद्धार केलेली मंदिरे व गंगा घाटचीही माहिती घेतली.
रोहित पवार यांनी मथुरेत जाऊन हरे रामा हरे कृष्णा नामा गजर जगभर पोचविणाऱ्या स्वामी प्रभूपाद यांचे दर्शन घेतले. तसेच इस्कॉन मंदिराला भेट दिली.
मथुरेतील काळाराम मंदिरात दर्शन घेताना आमदार रोहित पवार.
गोसेवा करताना आमदार रोहित पवार.
रोहित पवार यांनी अयोद्धेत सहकुटुंब जाऊन श्रीराम लल्ला व हनुमानगढी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
बोधगया येथे जाऊन आमदार रोहित पवार यांनी भगवान बुद्धांचे दर्शन घेतले.
सम्राट अशोकाने तयार केलेल्या स्तुपा समवेत आमदार रोहित पवार व त्यांचे कुटुंब.
सारनाथ येथील भगवान बुद्ध यांच्या मंदिरात सुनंदा पवार, कुंती पवार व आमदार रोहित पवार.
ध्यानधारणा करताना आमदार रोहित पवार.
फुटपाथवर नाष्टा करताना आमदार रोहित पवार व त्यांचे कुटुंब.
वृंदावना आमदार रोहित पवारांनी घेतला मलाई लस्सीचा आस्वाद
अयोद्धेतील मंदिरात दर्शन घेताना कुंती पवार, सुनंदा पवार व आमदार रोहित पवार.
युद्ध नको बुद्ध हवा असे तर रोहित पवारांना वाटत नसेल...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.